मुंबई : म्युच्युअल फंड हा गुंतवणूक पर्याय सर्वतोमुखी करणाऱ्या नियोजनबद्ध गुंतवणुकीच्या अर्थात ‘एसआयपी’ पद्धतीची लोकप्रियता उत्तरोत्तर वाढतच असून, २०२३ कॅलेंडर वर्षात नोव्हेंबरअखेरपर्यंत या माध्यमातून म्युच्युअल फंडात १.६६ लाख कोटींची भर पडली आहे. भांडवली बाजार नियामक ‘सेबी’च्या मते, म्युच्युअल फंडातील ‘एसआयपी’च्या माध्यमातून करावयाची किमान गुंतवणूक मर्यादा २५० रुपयांवर आणण्याच्या प्रयत्नाने गुंतवणुकीला अधिक चालना मिळेल.

म्युच्युअल फंड उद्योगाची शिखर संघटना ‘असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडिया (ॲम्फी)’ने दिलेल्या माहितीनुसार, यंदा वर्षातील पहिल्या ११ महिन्यांमध्ये झालेली गुंतवणूक ही गेल्या वर्षी (२०२२) याच कालावधीत झालेल्या १.५ लाख कोटींच्या गुंतवणुकीपेक्षा अधिक राहिली आहे. तर २०२१ मध्ये १.१४ लाख कोटी रुपये आणि २०२० मध्ये ९७,००० कोटी रुपये गुंतवणूक झाली होती.

IIT Mumbai to redesign Thane transport plan thane news
मुंबई आयआयटी करणार ठाण्याच्या वाहतुक आराखड्याची फेरआखणी; पुढील पाच वर्षांतील वाहतूक आव्हानांचा होणार अभ्यास
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
land acquisition for ring road
रिंग रोडसाठी २०० हेक्टर भूसंपादन बाकी; ५०० कोटींच्या निधीची रस्ते विकास महामंडळाकडे मागणी
loksatta readers feedback
लोकमानस: …त्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी!
butibori investment , jsw company battery project,
मुख्यमंत्र्यांच्या शहरात १५ हजार कोटींची गुंतवणूक; तब्बल ४५० एकर जमिनीवर…
Central Railway will run additional unreserved special trains between Amravati CSMT Adilabad and Dadar
महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांना आदरांजली वाहण्यासाठी मुंबईला जायचंय्? मग ‘हे’ वाचाच…
nmmc plans measures to find new properties but reaching 1000 crore tax target is challenging
हजार कोटींच्या करवसुलीचे पालिकेपुढे आव्हान सहा महिन्यांनंतर ३५० कोटींची करवसुली
Work on third and fourth railway lines at Kalyan Ambernath and Badlapur stations gained momentum
तिसऱ्या चौथ्या मार्गिकेतील महत्वाच्या टप्प्याला गती, मार्गिकेतील लहान मोठ्या पुलांच्या उभारणीसाठी निविदा जाहीर

हेही वाचा – प्रधानमंत्री मुद्रा योजनेंतर्गत मागील पाच आर्थिक वर्षांत २८.८९ कोटींहून अधिक कर्जदारांना १७.७७ लाख कोटींचे वितरण

अर्थव्यवस्थेविषयक उत्साहदायी दृष्टीकोन आणि गुंतवणूकदारांचा बाजारातील सहभाग वाढत आहे, एक शिस्तबद्ध आणि सुलभ गुंतवणुकीचा मार्ग म्हणून ‘एसआयपी’ला पसंती मिळण्याची आगामी काळात शक्यता अधिक आहे. बाजाराची सकारात्मक वाटचाल आणि निरोगी परताव्यासह, ‘एसआयपी’ वाढीचा कल या विश्वासाला बळकटी देत आहे. २०२४ अखेरपर्यंत हा कल टिकून राहील, असे मत मोतीलाल ओसवाल म्युच्युअल फंडाचे मुख्य व्यवसाय अधिकारी अखिल चतुर्वेदी यांनी व्यक्त केले.

‘एसआयपी’ म्हणजे काय?

‘थेंबे थेंबे तळे साचे’ या उक्तीप्रमाणे ‘एसआयपी’ ही म्युच्युअल फंडात नियमितपणे निश्चित रक्कम गुंतविण्याची पद्धत आहे. एकरकमी गुंतवणूक करण्याऐवजी महिन्यातून, तिमाहीतून अथवा सहामाहीतून एकदा विशिष्ट तारखेला गुंतवणूक केली जाऊ शकते. म्युच्युअल फंड योजनेत ‘एसआयपी’ म्हणजे दर महिन्याला नियमितपणे त्यावेळी असलेल्या ‘एनएव्ही’नुसार कमीत कमी २५० रुपये इतकी गुंतवणूक करता येते. या माध्यमातून अल्पशी परंतु नियमित गुंतवणूक केल्यास कालांतराने मोठ्या संपत्तीचा संचय होऊ शकतो.

हेही वाचा – चांगली बातमी! अटल पेन्शन योजनेच्या नोंदणीने ओलांडला ६ कोटींचा टप्पा; छोट्या गुंतवणुकीतून दरमहा ५००० रुपये पेन्शन मिळणार

‘एसआयपी’चा बोलबाला

विद्यमान वर्षात नोव्हेंबर महिन्यापर्यंत, ‘एसआयपी’च्या एकूण व्यवस्थापनाखालील मालमत्तेत ३८ टक्क्यांची वाढ झाली असून ती ९.३१ लाख कोटींवर पोहोचली आहे. जी डिसेंबर २०२२ अखेर ६.७५ लाख कोटी रुपये होती. सध्या म्युच्युअल फंड ‘एसआयपी’ खात्यांची संख्या सध्या ७.४४ कोटी आहेत. तर २०२३ कॅलेंडर वर्षात नोव्हेंबरपर्यंत समभागसंलग्न म्युच्युअल फंड योजनांमध्ये १.४४ लाख कोटींची गुंतवणूक झाली आहे.

Story img Loader