Startup Layoffs: गेल्या काही वर्षांत जगभरात लाखो लोकांनी त्यांच्या नोकऱ्या गमावल्या आहेत. जगातील मोठमोठ्या कंपन्यांनी फ्रेशर्सपासून ते बऱ्याच काळापासून काम करणाऱ्या लोकांना कामावरून काढून टाकले आहे. केवळ जागतिक स्तरावरच नव्हे तर भारतातही कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात नोकर कपात करण्यात आली आहे. मोठ्या कंपन्यांबरोबरच देशातील स्टार्टअप कंपन्यांनीही लोकांना कामावरून काढून टाकले आहे. भारतातील वाढत्या स्टार्टअप इकोसिस्टमला रोजगाराच्या गंभीर संकटाचा सामना करावा लागत आहे. स्टाफिंग फर्म्स आणि हेडहंटर्सच्या मते, स्टार्टअप्सवरील टाळेबंदी सार्वजनिकरीत्या नोंदवल्या गेलेल्यापेक्षा किमान तीन पटीने जास्त असल्याचा अंदाज आहे.
दोन वर्षांत अनेक कर्मचाऱ्यांनी स्टार्टअपमधून नोकरी सोडली
गेल्या २४ महिन्यांत म्हणजेच दोन वर्षांत १,४०० हून अधिक कंपन्यांनी सुमारे ९१ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढले आहे. लाइव्ह मिंटच्या अहवालानुसार, टेक केंद्रित हायरिंग फर्म TopHire कडील डेटामध्ये कामावरून कमी केलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या १,२०.००० पर्यंत पोहोचू शकते.
हेही वाचाः आजपासून पाच मोठे नियम बदलले, ‘या’ कामांची मुदतही सप्टेंबरमध्ये संपणार; थेट खिशावर होणार परिणाम
बऱ्याच मोठ्या कंपन्यांकडून नोकर कपात
जर आपणाला भारतीय स्टार्टअप कंपन्यांकडून होणाऱ्या नोकर कपातीबद्दल बोलायचे झाल्यास त्यात युनिकॉर्न्स किंवा १ बिलियन डॉलर किंवा त्याहून अधिक किमतीच्या स्टार्टअप्सचा समावेश होतो. यामध्ये Byju, Unacademy, Blinkit, Meesho, Vedantu, Oyo, Ola, Cars24 आणि Udaan या कंपन्यांनी कर्मचाऱ्यांची संख्या कमी केली आहे.
हेही वाचाः LPG सिलिंडरच्या किमतीत १५८ रुपयांची कपात, नवे दर काय?
कमी पैशामुळे अधिक नोकऱ्या गेल्या
सार्वजनिकरित्या उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या दोन वर्षांत २५,०००-२८,००० कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात आले आहेत. खरं तर तरलतेच्या संकटामुळे निधीची कमतरता निर्माण झाली आहे, ज्यामुळे भारतातील अनेक स्टार्टअप्सना त्यांच्या मासिक खर्चात कपात करावी लागली. तुटपुंज्या निधीमुळे स्टार्टअप्सना विपणन खर्च आणि पुनर्रचना खर्च कमी करणे भाग पडले आहे.