२०२३ वर्षात जुलै महिन्याचा खाण आणि उत्खनन क्षेत्राच्या खनिज उत्पादनाचा निर्देशांक १११.९ वर पोहोचला असून, जुलै २०२२ च्या तुलनेत हे प्रमाण १०.७ टक्के जास्त आहे. भारतीय खाण ब्युरोच्या (आयबीएम) तात्पुरत्या आकडेवारीनुसार, एप्रिल ते जुलै या कालावधीतील वाढ मागील वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत ७.३ टक्के इतकी आहे.

जुलै २०२३ मध्ये महत्त्वाच्या खनिजांच्या उत्पादनाच्या स्तरात वाढ झाली आहे. कोळसा ६९३ लाख टन, लिग्नाइट ३२ लाख टन, नैसर्गिक वायू (उपयुक्त ) ३०६२ दशलक्ष घन मीटर, पेट्रोलियम (कच्चे ) २५ लाख टन, बॉक्साइट १४७७ हजार टन, क्रोमाईट २८० हजार टन, तांबे घन १० हजार टन, सोने १०२ किलो, लोह धातू १७२ लाख टन, शिसे घन ३० हजार टन, मॅगनीज धातू २१७ हजार टन, जस्त घन १३२ हजार टन, चुनखडी ३४६ लाख टन, फॉस्फराईट १२० हजार टन आणि मॅग्नेसाइट १० हजार टन वाढ झाली आहे.

inflation rate declined
किरकोळ महागाई दराची उसंत, नोव्हेंबरमध्ये ५.४८ टक्क्यांवर घसरण
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Asian development bank marathi news
विकासदर अंदाजाला ‘एडीबी’कडूनही ६.५ टक्क्यांपर्यंत कात्री
indian stock market nifty sensex
अमेरिकी महागाई दराच्या प्रतीक्षेत निर्देशांकात नगण्य वाढ
s and p global ratings
अर्थव्यवस्थेची घोडदौड कायम राहणार – एसअँडपी; नवीन वर्षात मध्यवर्ती बँकेकडून व्याजदर दिलासा शक्य
Onion prices fall due to increased production
नाशिक : आवक वाढल्याने कांद्याची घसरण
3 percent errors possible in ladki bahin yojana application scrutiny
लाडकी बहीण योजनेच्या अर्ज छाननीत तीन टक्के त्रुटींचा संभव;  नाशिक विभागातील स्थिती
mazgaon bkc among most polluted areas due to nitrogen dioxide levels increase
माझगाव, वांद्रे-कुर्ला संकुल सर्वाधिक प्रदूषित; नायट्रोजन डायऑक्साइडच्या पातळीत वाढ

हेही वाचाः देशात २०७० सालापर्यंत शून्य कार्बन उत्सर्जनाचे ध्येय गाठण्यासाठी बांधकाम क्षेत्रात हरित उपक्रम राबवले जाणार – नितीन गडकरी

जुलै २०२२ च्या तुलनेत जुलै २०२३ दरम्यान अनेक खनिजांमध्ये सकारात्मक वाढ झाली आहे. क्रोमाईट (४५.९%), मॅगनीज धातू (४१.७%), कोळसा (१४.९%), चुनखडी (१२.७%), लोह धातू (११.२%), सोने (९.७%), तांबे घन (९%), नैसर्गिक वायू (उपयुक्त ८.९%), शिसे घन (४.७%), जस्त घन (३.६%), मॅग्नेसाइट (३.४%) आणि पेट्रोलियम (कच्चे ) (२.१%) अशी वाढ झाली आहे.

हेही वाचाः एशियन पेंट्सचे सह संस्थापक अश्विन दाणी यांचे निधन, कंपनीला सर्वात मोठी पेंट फर्म बनवण्यात मोलाचे योगदान

नकारात्मक वाढ दर्शविणाऱ्या इतर महत्त्वाच्या खनिजांमध्ये काही खनिजांचा समाविष्ट आहेत. लिग्नाइट (-०.७%), बॉक्साइट (-३.२%), फॉस्फराइट (-२४.७%) आणि हिरे (-२७.३%) या खनिजांमध्ये नकारात्मक वाढ झाली आहे.

Story img Loader