अयोध्येतील राम मंदिराचे भव्य उद्घाटन २२ जानेवारी २०२४ रोजी पार पडले आहे. पंतप्रधानांपासून ते देशातील प्रसिद्ध अभिनेते आणि उद्योगपती उपस्थित आहेत. त्यानंतर भव्य राम मंदिर देशाला समर्पित केले गेले आहे. या मंदिराचा आर्थिकदृष्ट्या राज्य आणि देशाला कसा फायदा होईल, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. उत्तर प्रदेश दरवर्षी २५ हजार कोटी रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न मिळवू शकतो, असे एक दिवसापूर्वी एसबीआयने आपल्या अहवालात म्हटले होते. आता राम मंदिर आणि अयोध्येच्या मेकओव्हरमुळे भारतातील पर्यटकांच्या संख्येत ५ कोटींहून अधिक पर्यटकांची वाढ होण्याची शक्यता आहे, असा अंदाज एका विदेशी ब्रोकरेज कंपनीने वर्तवला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

विदेशी ब्रोकरेज फर्म जेफरीजने एका रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, राम मंदिराचे उद्घाटन आणि प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर देशात मोठा आर्थिक परिणाम दिसून येणार आहे. राम मंदिरामुळे भारताला एक नवीन पर्यटन स्थळ मिळत आहे, ज्यामुळे देशातील पर्यटकांची संख्या दरवर्षी ५० दशलक्ष म्हणजेच ५ कोटींहून अधिक वाढू शकते. जेफरीजच्या रिपोर्टनुसार, १० बिलियन डॉलर व्यवसाय हा (नवीन विमानतळ, रेल्वे स्टेशन, टाऊनशिप, उत्तम रस्ते संपर्क इ.) नवीन हॉटेल्स आणि इतर आर्थिक हालचालींमुळे होणार आहे. तसेच देशातील पर्यटन वाढवण्यासाठी नवीन रोडमॅप तयार करू शकतो. अयोध्या हे भारताच्या पर्यटन वाढीसाठी एक टेम्प्लेट आहे, जे १० बिलियन डॉलरसह आता प्राचीन शहराला जागतिक धार्मिक आणि अध्यात्मिक पर्यटन हॉटस्पॉटच्या स्वरूपात बदलणार आहे, असे रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

हेही वाचाः Ram Janmbhoomi Mandir : १००० वर्षे श्रीरामजन्मभूमी मंदिर टिकून राहणार, L&T चा दावा

विमानतळ आणि रेल्वे स्थानकांचा फायदा होणार

नवीन राम मंदिर २२५ दशलक्ष डॉलर्स खर्चून बांधले जाणार आहे. पर्यटन वाढण्याची अपेक्षा असून, अयोध्येतील आर्थिक आणि धार्मिक स्थलांतर वाढण्याची शक्यता आहे. हॉटेल्स, एअरलाइन्स, हॉस्पिटॅलिटी, एफएमसीजी, सिमेंट इत्यादींसह अनेक क्षेत्रांना त्याचा लाभ मिळेल. अयोध्येत नवीन विमानतळ तयार आहे. पहिला टप्पा १७५ दशलक्ष डॉलरमध्ये पूर्ण झाला आहे आणि १ दशलक्ष प्रवाशांची त्याची क्षमता आहे. २०२५ पर्यंत ६० लाख प्रवाशांच्या क्षमतेसह अतिरिक्त देशांतर्गत क्षमता आणि आंतरराष्ट्रीय टर्मिनलदेखील तयार होण्याची अपेक्षा आहे. दररोज ६० हजार प्रवासी क्षमतेसाठी रेल्वे स्थानकाची नवीन रचना करण्यात आली आहे. दुसरीकडे १२०० एकर ग्रीनफिल्ड टाऊनशिपची योजना आखली जात आहे आणि रस्त्यांची जोडणीही वाढवली जात आहे.

हेही वाचाः Ram Mandir Ayodhya Inauguration Live: प्राणप्रतिष्ठेचे विधी संपन्न; प्रभू श्रीरामांच्या मूर्तीचं पहिलं दर्शन! पाहा Video

GDP मध्ये पर्यटनाचा किती वाटा ?

जेफरीजच्या अहवालात असे म्हटले आहे की, भारतात पर्यटनासाठी प्रचंड क्षमता आहे. पर्यटनाने आर्थिक वर्ष २०१९ च्या GDP मध्ये १९४ अब्ज डॉलरचे योगदान दिले आणि आर्थिक वर्ष २०३३ पर्यंत ८ टक्के CAGR ने वाढून ४४३ अब्ज डॉलर होण्याची अपेक्षा आहे. भारतातील पर्यटन आणि जीडीपीचे प्रमाण जीडीपीच्या ६.८ टक्के आहे. भारतात धार्मिक पर्यटन खूप मोठे आहे. धार्मिक पर्यटन हे अजूनही भारतातील सर्वात मोठे पर्यटन क्षेत्र आहे. सध्या अनेक कमतरता असूनही दरवर्षी १ ते ३ कोटी पर्यटक देशातील लोकप्रिय धार्मिक स्थळांना भेट देतात. अशा परिस्थितीत उत्तम कनेक्टिव्हिटी आणि पायाभूत सुविधांसह नवीन धार्मिक पर्यटन केंद्र (अयोध्या) बांधल्यास मोठा आर्थिक परिणाम होण्याची शक्यता आहे.