पीटीआय, नवी दिल्ली

नव्या पिढीची ‘ग्रो’ ही दलाली पेढी आता म्युच्युअल फंड वितरक म्हणूनही चांगली कामगिरी करत असून, सरलेल्या डिसेंबर महिन्यात २५ टक्के योगदानासह तिने १० लाख नवीन एसआयपी खाती जोडली आहेत.म्युच्युअल फंडाची शिखर संस्था असलेल्या ‘ॲम्फी’च्या आकडेवारीनुसार, एसआयपी खात्यांची संख्या ७.६३ कोटींवर पोहोचली आहे, त्यापैकी डिसेंबरमध्ये ४०.३ लाख नवीन एसआयपी खाती जोडण्यात आली आहेत, जी आतापर्यंत एका महिन्यात नोंदवली गेलेली सर्वाधिक वाढ आहे. डिसेंबरमध्ये भर पडलेल्या ४०.३ लाख नवीन ‘एसआयपी’ खात्यांपैकी १० लाखांहून अधिक गुंतवणूकदारांनी ग्रोच्या माध्यमातून सुरू केली आहेत.

सरलेल्या २०२३ या संपूर्ण वर्षामध्ये सुमारे ३.५ कोटी नवीन एसआयपी खाती उघडण्यात आली आणि यात ग्रोचे योगदान २० टक्के होते, असे कंपनीने म्हटले आहे.नवीन एसआयपी खाती उघडण्यात ५० टक्क्यांहून अधिक वाढ साधली आहे, तर ग्रो बाबतीत ती गेल्या १२ महिन्यांत दुपटीने वाढली आहेत, असे ग्रोचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सह-संस्थापक हर्ष जैन म्हणाले. एसआयपीमधील गुंतवणूकदारांचे योगदान महिना दर महिना आधारावर वाढत आहे. नोव्हेंबरमधील १७,०७३ कोटींवरून डिसेंबरमध्ये ते १७,६१० कोटींच्या सार्वकालिक उच्चांकावर ते पोहोचले आहे.

हेही वाचा >>>रिझर्व्ह बँकेकडून  व्याजदर कपातीची शक्यता धूसर; आजपासून सुरू झालेल्या पतधोरण बैठकीच्या निर्णयाबाबत ‘एसबीआय रिसर्च’चा अंदाज

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दिवसेंदिवस वाढणारी आर्थिक जागरूकता आणि अर्थविषयक शिक्षणामध्ये वाढलेल्या स्वारस्याने गुंतवणूकदारांना सूज्ञतेने निर्णय घेण्यास सक्षम बनवले आहे. किरकोळ गुंतवणूकदारांना म्युच्युअल फंडातील ‘डिरेक्ट’ गुंतवणुकीच्या फायद्याबद्दल जागरूकता निर्माण झाली आहे. कमिशन, शुल्क वाचत असल्याने गुंतवणूकदार आता या मंचाच्या माध्यमातून ‘डिरेक्ट’ गुंतवणूक करत आहेत.