रिअल इस्टेट डेव्हलपर्स आणि काही व्यावसायिक संस्थांनी २०२३ मध्ये सर्व शहरांमध्ये विक्रमी किमतीत जमिनी खरेदी केल्या आहेत. जमिनीच्या वाढत्या किमती आणि इतर खर्च यांचा परवडणाऱ्या घरांच्या विभागावर परिणाम झाला आहे. अॅनारॉक रिसर्चच्या म्हणण्यानुसार, यंदा किमान दोन जमिनीच्या करारांची किंमत प्रति एकर १०० कोटी रुपये होती. जानेवारी ते ऑगस्ट २०२३ दरम्यान देशभरात २०१८ एकरांसाठी ५९ स्वतंत्र जमिनीचे व्यवहार झालेत. मागील वर्षाच्या याच कालावधीत शहरांमध्ये १४३८ एकरांपेक्षा जास्त जमिनीचे सुमारे ५० करार झाले होते. जानेवारी-ऑगस्ट २०२३ दरम्यान मोठ्या जमिनीच्या व्यवहारासाठी फार कमी जमिनीचे करार झाले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उदाहरणार्थ, हैदराबादमधील राजपुष्पा प्रॉपर्टीजने केवळ ३.६ एकर जमीन ३६२ कोटी रुपयांना खरेदी केली. हा करार निवासी प्रकल्पासाठी होता. गुरुग्राममध्ये गोदरेज प्रॉपर्टीजने निवासी प्रकल्पासाठी ७.९१ एकर जमीन ९०० कोटी रुपयांना खरेदी केली. मुंबईत अजमेरा रियल्टीने १.२४ एकर जमीन ७६ कोटी रुपयांना खरेदी केली. “अंदाजे ७४० एकरसाठी तीन सर्वात मोठे जमिनीचे करार अहमदाबादमध्ये झाले होते. लुधियाना आणि बंगळुरूमध्ये प्रत्येकी ३००+ एकरमध्ये प्रत्येकी एक सौदा झाला आहे. डील नंबर्सच्या बाबतीत बोलायचे झाल्यास निवासी रिअल इस्टेटने सर्वात जास्त आकर्षित केले आहे,” असंही अॅनारॉक ग्रुपचे चेअरमन अनुज पुरी सांगतात.

२०२३ मधील जमीन करारांची ठळक वैशिष्ट्ये

२०२३ (जानेवारी-ऑगस्ट) मध्ये झालेल्या ५९ जमीन करारांपैकी अंदाजे टॉप ७ शहरांमध्ये निवासी विकासासाठी २८३+ एकरसाठी ३८ करार प्रस्तावित आहेत
चेन्नई, अहमदाबाद आणि लुधियाना यांसारख्या शहरांमध्ये टाऊनशिप प्रकल्पांसाठी १,१३६+ एकरांसाठी ५ करार निश्चित केले आहेत
नोएडा, गुरुग्राम, पुणे आणि बंगळुरू येथे ६२+ एकरासाठी ४ करार झाले आहेत
चेन्नई, रायगड आणि गुरुग्राम यांसारख्या शहरांमध्ये प्लॉट केलेल्या विकासासाठी १५४ एकरांपेक्षा जास्त जमिनीचे ३ स्वतंत्र करार झाले आहेत
दिल्ली, नोएडा आणि गुरुग्राम यांसारख्या NCR शहरांमध्ये १६.५ एकर करार व्यावसायिक विकासासाठी झाले आहेत
बंगळुरूमध्ये उत्पादनासाठी ३०० एकरपेक्षा जास्त एक मोठा करार निश्चित करण्यात आला आहे.

हेही वाचाः चांद्रयान ३ ने चंद्रावर तिरंगा फडकावला अन् दुसरीकडे ‘या’ १३ कंपन्यांनी २० हजार कोटींची केली कमाई

शहरानुसार ट्रेंड काय?

एकूण जमीन व्यवहाराच्या बाबतीत अहमदाबाद अंदाजे यंदा ऑगस्टपासून आतापर्यंत ७४० एकरांचे व्यवहार झाले आहेत. १७ करारांमध्ये मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) सर्वाधिक संख्या दिसली; एकूण व्यवहार फक्त ९५+ एकर होते. काही मोठ्या जमिनीच्या करारांची किंमत १०० कोटी रुपये प्रति एकरपेक्षा जास्त झाली आहे.

हेही वाचाः स्पाइसजेटला मोठा झटका, कलानिधी मारन यांना २७० कोटी देण्याचे आदेश, नेमकं प्रकरण काय?

२०२३ मधल्या शहरांमधील महत्त्वाचे जमीन करार

हैदराबादने १८+ एकरसाठी २ स्वतंत्र करार केलेत, जे जानेवारी ते ऑगस्ट २०२३ दरम्यान व्यवहार केलेल्या एकूण जमिनीपैकी फक्त १ टक्के आहे.

NCR ने १३ स्वतंत्र व्यवहार केले आहेत, जे एकूण व्यवहार केलेल्या जमिनीपैकी ४ टक्के आहेत. यामध्ये गुरुग्राममध्ये एकूण ६१.६ एकरसाठी ९ सौद्यांचा समावेश आहे. ३ नोएडामध्ये १९+ एकरसाठी आणि दिल्लीमध्ये अंदाजे एक प्रस्तावित विकासामध्ये सौदा करण्यात आला आहे. निवासी, किरकोळ, व्यावसायिक आणि प्लॉटेड विकास यांचा समावेश आहे.

बंगळुरूने ४०१+ एकरासाठी ८ स्वतंत्र सौदे केलेत, जे एकूण व्यवहार केलेल्या जमिनीपैकी २० टक्के आहेत, जे उत्पादन, निवासी आणि इतर वापरासाठी राखून ठेवलेले आहेत.

पुण्यात अंदाजे ५ वेगळे करार झालेत. ४४ एकर, संपूर्ण शहरांमध्ये व्यवहार केलेल्या एकूण भूभागाच्या फक्त २ टक्के भाग आहे, निवासी आणि इतर वापराच्या विकासासाठी प्रस्तावित आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 100 crores per acre major land transactions in 2023 vrd
Show comments