मुंबई: आगामी दोन आर्थिक वर्षांत तब्बल एक हजार नवीन कंपन्या प्राथमिक बाजारात प्रारंभिक समभाग विक्रीच्या (आयपीओ) माध्यमातून गुंतवणूकदारांना अजमावण्याची अपेक्षा आहे, असा असोसिएशन ऑफ इन्व्हेस्टमेंट बँकर्स ऑफ इंडियाने (एआयबीआय) शुक्रवारी अंदाज वर्तविला. गेल्या काही वर्षांत भारतीय भांडवली बाजार प्रचंड वेगाने वाढत आहे. अर्थव्यवस्थेची मजबूत वाढ, अनुकूल बाजार स्थिती आणि नियामक चौकटीतील सुधारणांमुळे ‘आयपीओ’च्या माध्यमातून निधी उभारणाऱ्या कंपन्यांची संख्या वाढेल. पुढील आर्थिक वर्षात (२०२५-२६) आयपीओ आणि पात्र संस्थात्मक निधी उभारणीच्या (क्यूआयपी) माध्यमातून एकूण ३ लाख कोटी रुपयांचे भांडवलाचे संकलन अपेक्षित आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> ‘आयटी’मुळे सप्ताहअखेर घसरणीने; ‘सेन्सेक्स’चे ४२३ अंशांनी नुकसान

गेल्या सहा आर्थिक वर्षांत, एकूण ८५१ कंपन्यांनी भांडवली बाजारातून निधी उभारणी केली. यामध्ये मुख्य बाजारमंचावर २८१ नवीन कंपन्या सूचिबद्ध झाल्या आहेत. भांडवली बाजारात सूचिबद्ध होत असलेल्या सूक्ष्म, लघू आणि मध्यम श्रेणीतील अर्थात एसएमई कंपन्यांचे प्रमाण आणि त्यातून गुंतवणूकदारही भरभरून लाभ कमावत असल्याचे सध्याचे चित्र आहे. परिणामी, त्यांच्या विशेष मंचावर आतापर्यंत ५७० कंपन्या सूचिबद्ध झाल्या आहेत. या माध्यमातून या कंपन्यांनी एकत्रितपणे ४.५८ लाख कोटी रुपये उभारले आहेत.

हेही वाचा >>> दोन आर्थिक वर्षांत ६.७ टक्के विकास दराने भारताचे मार्गक्रमण – जागतिक बँक

आर्थिक वर्ष २०२४ मध्ये, ‘आयपीओ’द्वारे एकूण ६७,९५५ कोटी रुपये उभारण्यात आले. यामध्ये मुख्य मंचाच्या माध्यमातून ६१,८६० कोटी रुपये आणि एसएमई मंचावर ६,०९५ कोटी रुपये उभारण्यात आले. शिवाय, ६१ कंपन्यांनी क्यूआयपीद्वारे सुमारे ६८,९७२ कोटी रुपये मिळवले. भारताने २०२४ मध्ये ‘आयपीओ’च्या संख्येबाबतीत जागतिक स्तरावर अव्वल स्थान मिळवून अभूतपूर्व कामगिरी केली. सुमारे ३३५ आयपीओंसह, भारताने अमेरिका आणि युरोपलाही मागे सारले. गेल्या दोन आर्थिक वर्षांपासून ‘आयपीओ’द्वारे निधी उभारणीचे प्रमाणही लक्षणीय वाढले आहे. पुढील आर्थिक वर्षात, म्हणजेच २०२५-२६ मध्ये आयपीओ आणि क्यूआयपीद्वारे भांडवल संकलनाची एकूण रक्कम ३ लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक राहण्याची अपेक्षा आहे, असे ‘एआयबीआय’चे अध्यक्ष महावीर लुनावत म्हणाले.