वृत्तसंस्था, नवी दिल्ली

देशातील सर्वात मोठी प्रारंभिक समभाग विक्री (आयपीओ) प्रस्तावित करणाऱ्या ह्युंदाई मोटर इंडियाने, त्यापूर्वीच आर्थिक वर्ष २०२४ साठी १०,००० कोटी रुपयांपेक्षा अधिक लाभांश तिच्या विद्यमान भागधारकांसाठी मंजूर करवून घेतला. उल्लेखनीय म्हणजे भागधारकांना सर्वाधिक लाभांश वितरण करणारी सातवी भारतीय कंपनी ठरली आहे.

20 thousand rupees grant to Nashik municipal employees nashik news
नाशिक मनपा कर्मचाऱ्यांना २० हजार रुपये सानुग्रह अनुदान; प्रशासकीय राजवटीत दिवाळी गोड
ankita walawalkar reveals marriage plans and talk about future husband
अंकिताचा ‘कोकण हार्टेड बॉय’ कोण आहे? कोकणात करणार…
Digital Arrest, Even educated, scam,
शहरबात…. सुक्षिशित असलेले ‘अशिक्षित’
swiggy gets sebi approval to raise funds via ipo
‘स्विगी’च्या भागधारकांकडून वाढीव निधी उभारणीस मंजुरी
sebi change rules in futures and options
विश्लेषण : वायदे व्यवहारांबाबत ‘सेबी’प्रणीत नियम बदल कशासाठी? यातून गुंतवणूकदारांना काय फायदा?
Indian Stock Market Surges
गुंतवणूकदारांच्या झोळीत २०२४ मध्ये १११ लाख कोटींची श्रीमंती
tanishk vice president arun narayan
‘नैसर्गिकच्या तुलनेत कृत्रिम हिऱ्यांना अनेकांगी मर्यादा’; तनिष्कचे उपाध्यक्ष अरुण नारायण यांचे प्रतिपादन
Anmol Ambani fined 1 crore by SEBI print eco news
अनमोल अंबानी यांना सेबीचा एक कोटी दंड

ह्युंदाई मोटर इंडियाने भागधारकांना प्रतिसमभाग १३,२७० रुपयांचा म्हणजेच १,३२७ टक्के विशेष लाभांश दिला आहे. एकंदर १०,७८२.४२ कोटी रुपयांचा लाभांश दिला जाणार आहे. गेल्यावर्षी म्हणेजच २०२२-२३ या वर्षात कंपनीने ४,६५३.४२ कोटी आणि २०२१-२२ मध्ये १,४९३.४५ कोटी रुपयांचा लाभांश दिला होता.

हेही वाचा : रांजणगावमध्ये ब्रिटानियाचा चीझ प्रकल्प

टीसीएस आघाडीवर

भागधारकांना भरभरून लाभांश देणाऱ्या कंपन्यांमध्ये टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस अर्थात टीसीएसचे नाव आघाडीवर आहे. वर्ष २०२३-२४ मध्ये टीसीएसने १६,२९० कोटी रुपयांचा लाभांश दिला आहे. त्यानंतर एचसीएल टेक्नॉलॉजीज १४,०८० कोटी आणि कोल इंडियाने १२,६३३ कोटी रुपयांचा लाभांश लाभ देऊ केला आहे. याबरोबरच ओएनजीसी १२,२६५ कोटी, स्टेट बँक १२,२२६ कोटी, आणि वेदान्तने १०,९५९ कोटी रुपयांचा लाभांश वितरण केले आहे. अर्थात समभागांच्या बाजारात सूचिबद्धतेनंतर, म्हणजे सार्वजनिक कंपनी बनल्यानंतरची ही या कंपन्यांची लाभांश देयतेची कामगिरी आहे.

ह्युंदाई इंडियाने या ‘आयपीओ-पूर्व’ विशेष लाभांशानंतर तिच्याकडील रोख आणि बँकेतील शिल्लक गंगाजळी ९,०१७.३५ कोटींवर खालावली आहे, जी वर्षापूर्वी १७,७४१.१५ कोटी होती.

हेही वाचा : RBI Repo Rate: व्याजदराबाबत रिझर्व्ह बँकेचं ‘आस्ते कदम’ चालूच; सलग दहाव्यांदा कोणतेही बदल नाहीत!

ह्युंदाई मोटर्स इंडिया ही दक्षिण कोरियातील ह्युंदाई मोटर समूहाची उपकंपनी आहे. तर प्रवासी वाहन विक्रीची तुलना केल्यास जगातील तिसऱ्या क्रमांकाची मोठी कंपनी आहे. ह्युंदाई मोटर्स इंडियाचा आयपीओ पुढील आठवड्यात १५ ऑक्टोबर ते १७ ऑक्टोबर दरम्यान विक्रीसाठी खुला होणार असून त्यासाठी कंपनीने १,८६५ ते १,९५० रुपये किंमतपट्टा निश्चित केला आहे.

पालक कंपनीपेक्षा मूल्यांकन महागडे

इक्विटस इन्व्हेस्टमेंटने दिलेल्या माहितीनुसार, ह्युंदाई मोटर्स इंडियाने भागविक्रीसाठी निर्धारित केलेल्या किमतीनुसार तिचे किंमत/उत्पन्न गुणोत्तर अर्थात पी/ई रेशो हा २७ पट आहे. तर पालक कंपनी ह्युंदाई मोटर्सचा पी/ई रेशो हा ५ पट आहे. ह्युंदाई मोटर्स इंडियाचे पालक कंपनीच्या जागतिक महसुलात केवळ ६.५ टक्के आणि जागतिक नफ्यात ८ टक्के योगदान असूनही सूचिबद्धतेनुसार मूळ कंपनीच्या बाजार भांडवलाच्या सुमारे ४२ टक्के अधिक तिने मूल्यांकन मिळविले आहे.