मुंबई: मालवाहतूक क्षेत्रात ट्रक चालकांसाठी ‘ब्लॅकबक’ या नाममुद्रेने डिजिटल व्यासपीठ चालवणाऱ्या झिंका लॉजिस्टिक सोल्युशन्स लिमिटेडने प्रत्येकी २५९ रुपये ते २७३ रुपये किंमत श्रेणीत प्रारंभिक समभाग विक्रीच्या (आयपीओ) माध्यमातून १,११५ कोटी रुपये उभारण्याचे प्रस्तावित केले आहे. ही समभाग विक्री सार्वजनिक बोलीसाठी १३ नोव्हेंबरला खुली होईल आणि १८ नोव्हेंबरला बंद होईल.
या भागविक्रीपैकी ५५० कोटी रुपये हे नव्याने समभाग जारी करून उभारले जातील. याव्यतिरिक्त कंपनीचे प्रवर्तक आणि विद्यमान भागधारकांनी त्यांच्या हाती असलेल्या समभागांपैकी २.०६ कोटी समभागांची विक्री (ऑफर ऑफ सेल) प्रस्तावित केली आहे, ज्यायोगे ५६५ कोटी रुपये उभारले जातील. किरकोळ वैयक्तिक गुंतवणूकदारांना या ‘आयपीओ’त किमान ५४ समभाग आणि त्यानंतर ५४ समभागांच्या पटीत बोली लावता येईल. कर्मचाऱ्यांसाठी राखीव भागातून बोली लावणाऱ्या कंपनीच्या पात्र कर्मचाऱ्यांना प्रति समभाग किमतीत २५ रुपयांची सवलत दिली गेली आहे.
हेही वाचा >>>जेट एअरवेजच्या फेर-उड्डाणाची शक्यता संपुष्टात; सर्वोच्च न्यायालयाचा कंपनी अवसायानांत काढण्याचे आदेश
जवळपास १० लाख ट्रकचालक झिंकाच्या ‘ब्लॅकबक’ व्यासपीठाचे वापरकर्ते असून, त्यायोगे पथकर, इंधनासाठी देयक भरणा, जीपीएसद्वारे फिरतीवर असलेल्या वाहनांचा माग, भाडे व्यवस्थापन आणि बँका व वित्तसंस्थांकडून सुलभ वित्तसाहाय्यासाठी मदत अशा सेवांचा लाभ घेत असल्याचे कंपनीचे संस्थापक तसेच अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राजेश याबाजी यांनी सांगितले. २०१५ मध्ये सुरू झालेल्या कंपनीने आजच्या घडीला ट्रकद्वारे मालवाहतूक बाजारपेठेचा सुमारे २८ टक्के काबीज केला असून, प्रति ग्राहक ३,५२५ रुपयांचा महसूल कंपनी मिळवीत आहे. भागविक्रीतून उभे राहणाऱ्या ५५० कोटींपैकी २०० कोटी हे विक्री व विपणन उपक्रमांसाठी, १४० कोटी रुपये ब्लॅकबक फिनसर्व्हमधील गुंतवणुकीसाठी आणि उर्वरित भविष्यातील भांडवली गरजांची पूर्ततेसाठी आणि उत्पादन विकासासाठी वापरात येणार आहे.