मुंबई: गुंतवणुकीच्या वेगवेगळ्या वाटा चोखाळत असताना, जीवनांत कमावलेल्या पैशाचे नेमके व्यवस्थापन आणि वारसा हक्कही ठरविणे तितकेच महत्त्वाचे ठरते. म्हणजेच ‘इच्छापत्रा’सारख्या सरळ-सोपा दस्तऐवज बनवण्याकडे दुर्लक्ष केले जाऊ नये. इच्छापत्र आणि त्याच्या अनेकांगाबाबत महत्त्वाचे मार्गदर्शन, येत्या बुधवारी १३ मार्चला ठाण्यात आयोजित ‘लोकसत्ता अर्थब्रह्म’च्या ११ व्या वार्षिक अंकाच्या प्रकाशनानिमित्त परिसंवादात केले जाणार आहे. संपत्ती व्यवस्थापनांत अत्यंत महत्त्वाचे, परंतु खूपच साध्या आणि सोप्या असलेल्या ‘इच्छापत्रा’च्या प्रक्रियेचे महत्त्व, ते कसे बनवावे आणि संलग्न प्रश्नांची उत्तरे ‘लोकसत्ता अर्थब्रह्म’च्या या विशेष सत्रात तज्ज्ञांकडून दिली जातील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> जेट एअरवेजच्या मालकीच्या ‘जालान-कालरॉक’कडे हस्तांतरणास ‘एनसीएलएटी’ची मान्यता

गुंतवणूक साक्षरतेच्या उपक्रमांतर्गत आदित्य बिर्ला सन लाइफ मुच्युअल फंड प्रस्तुत हा ‘लोकसत्ता अर्थब्रह्म’ परिसंवादाचा कार्यक्रम बुधवार, १३ मार्च २०२४ रोजी सायंकाळी ६.०० वाजता, सहयोग मंदिर, घंटाळी, नौपाडा, ठाणे (पश्चिम) येथे होत आहे. लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप सोसायटी लि. सहप्रायोजक असलेला कार्यक्रम विनामूल्य आणि सर्वासाठी खुला आहे. त्याचप्रमाणे उपस्थित श्रोत्यांना त्यांच्या इच्छापत्र तसेच गुंतवणूकविषयक समस्या-शंकांबाबत प्रश्न विचारून तज्ज्ञांकडून त्याची उत्तरेही मिळवता येतील.

शेअर बाजारात तेजीचे उधाण आणि सेन्सेक्स-निफ्टी हे प्रमुख निर्देशांक नवनवीन शिखर गाठत असल्याचा अनुभव सध्या येत आहेत. मात्र, देशाची सध्याची आर्थिक स्थिती आणि आर्थिक धोरणांनी आखून दिलेली दिशा पाहता विकासाच्या क्षेत्रातील उत्तम कंपन्यांचे समभाग निवडून दीर्घकालीन गुंतवणुकीचे धोरण आखता येऊ शकते. अशाच शेअर खरेदीबाबत या क्षेत्रातील तज्ज्ञ अभ्यासक व स्तंभलेखक अजय वाळिंबे हे या कार्यक्रमात मार्गदर्शन करतील.

हेही वाचा >>> अस्थिरतेच्या छायेत ‘सेन्सेक्स’मध्ये १६५ अंशांची कमाई

गुंतवणुकीच्या दिशादर्शनाचे अकरावे वर्ष…

गुंतवणूकदारांच्या मनात डोकावणाऱ्या सर्व शंका, कुशंका, धोके, फायदे तसेच विविध योजना आणि पर्यायांसह अनेक विषयांची सखोल माहिती देणारा ‘लोकसत्ता अर्थब्रह्म’ सलग अकराव्या वर्षी प्रकाशित होत आहे. केंद्रीय अर्थसंकल्पानंतर काही दिवसांतच, नवीन आर्थिक वर्षांसाठी गुंतवणूकदारांना सजग आणि सज्ज करणाऱ्या या विशेष वार्षिकांकाचे आजवर नेहमीच स्वागत होत आले आहे. अर्थसंकल्पीय तरतुदी आणि बदलती बाजार स्थिती यातून गुंतवणुकीला आवश्यक ठरणारे नवीन वळण आणि त्या बद्दलचे मार्गदर्शन हे यंदाच्या अंकाचेही वैशिष्ट्य आहे.

 ‘लोकसत्ता अर्थब्रह्म’ प्रकाशन

मुख्य प्रायोजक: आदित्य बिर्ला सन लाईफ मुच्युअल फंड

सहप्रायोजक: लोकमान्य मलटिपर्पज को-ऑप सोसायटी लि.

कधी? बुधवार, १३ मार्च २०२४, सायंकाळी ६ वाजता

कुठे? सहयोग मंदिर, घंटाळी, नौपाडा, ठाणे (पश्चिम)

कार्यक्रमासाठी प्रवेश सर्वासाठी खुला आणि विनामूल्य असेल.

Mutual fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully