मुंबई : देशात ऑनलाइन डिजिटल आर्थिक व्यवहारांची संख्या मार्च २०२४ अखेर १२.६ टक्क्यांनी वाढली आहे, अशी माहिती रिझर्व्ह बँकेच्या निर्देशांकांवरून शुक्रवारी पुढे आली. रिझर्व्ह बँकेचा डिजिटल पेमेंट निर्देशांक (रिझर्व्ह बँक-डीपीआय) मार्च २०२४ च्या अखेरीस ४४५.५ वर पोहोचला आहे. सप्टेंबर २०२३ अखेर तो ४१८.७७ अंशांवर आणि मार्च २०२३ मध्ये तो ३९५.५७ अंशांवर होता.
‘रिझर्व्ह बँक-डीपीआय’मध्ये संपूर्ण देशभरातील डिजिटल देयक व्यवहार हे संबंधित पायभूत सुविधांमध्ये लक्षणीय वाढ झाल्यामुळे सर्व मापदंडांच्या मानाने लक्षणीय वाढले आहेत. मध्यवर्ती बँकेने संपूर्ण देशात व्यवहारांचे डिजिटायझेशन किती प्रमाणात सुरू आहे हे जाणून घेण्यासाठी २०१८-१९ हे आधार वर्ष मानून मार्च २०१८ मध्ये समग्र ‘रिझर्व्ह बँक-डीपीआय’ची घोषणा केली होती.
हेही वाचा >>>Gold-Silver Price: ग्राहक आनंदी! सोन्याचे भाव कोसळले; १० ग्रॅमचा भाव ऐकून आताच सराफा बाजार गाठाल!
निर्देशांकामध्ये पाच विस्तृत मापदंडांचा समावेश आहे, जे वेगवेगळ्या कालावधीत देशात डिजिटल देयक व्यवहारांचा विस्तार आणि मोजमाप करतात. हा निर्देशांक मार्च २००२ पासून अर्धवार्षिक आधारावर समग्र रूपात, दर चार महिन्यांच्या अंतराने प्रकाशित केला जातो.