Success Story : साधारणपणे २० वे वर्षे हे अभ्यासाचे वय असते. प्रत्येक मुलगा किंवा मुलगी तारुण्याच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवताच आपल्या करिअरचा विचार करू लागतात. पण आदित पालिचाबद्दल बोलायचे झाल्यास तो वेगळाच आहे. लहान वयात १२०० कोटी रुपये कमावणाऱ्या मुलांमध्ये आदित पालिचा समावेश होतो. आदित पालिचा त्या कंपनीचे सीईओ आहे, ज्यांचे २०२२ मध्ये मूल्यांकन ९०० दशलक्ष डॉलर म्हणजेच ७३०० कोटी पार केले आहे. विशेष बाब म्हणजे अवघ्या एका वर्षात या मुलाने आपल्या मित्रासोबत कोट्यवधींची कंपनी स्थापन केली. ऑनलाइन किराणा वितरण प्लॅटफॉर्म Zepto २०२१ मध्ये लाँच करण्यात आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

२००१ मध्ये मुंबईत जन्मलेल्या आदित पालिचा याने वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी व्यवसायाला सुरुवात केली आणि त्यांनी GoPool नावाचा स्टार्टअप सुरू केला. संगणक अभियांत्रिकी पूर्ण करण्यासाठी तो यूएसमधील स्टॅनफोर्ड विद्यापीठात शिकण्यासाठी गेला, परंतु स्टार्टअप सुरू करण्यासाठी त्याने अभ्यासक्रम अर्धवट सोडला आणि त्याचा निर्णय योग्य असल्याचे सिद्ध झाले.

कंपनीची उलाढाल १ महिन्यात कोटींवर पोहोचली

आदितने त्याचा मित्र कैवल्य वोहरा यांच्यासोबत एप्रिल २०२१ मध्ये ऑनलाइन किराणा वितरण प्लॅटफॉर्म Zepto सुरू केला. स्टार्टअप सुरू केल्याच्या १ महिन्याच्या आत कंपनीचे मूल्यांकन २०० दशलक्ष डॉलर झाले. कोरोना महामारीच्या काळात त्यांनी १० मिनिटांत किराणा सामान पोहोचवण्यासाठी हा स्टार्टअप सुरू केला आणि त्यांची संकल्पना खूप यशस्वी झाली. आदित पलिचाचा मित्र आणि कंपनीचे सहसंस्थापक कैवल्य वोहरा यांचीही कहाणी अशीच आहे. दोघेही स्टार्टअप सुरू करण्यासाठी स्टॅनफोर्डमधून बाहेर पडले. याआधी दोघांनी किरणकार्ट नावाचा स्टार्टअप सुरू केला होता, परंतु त्यांना त्यांचे उत्पादन बाजारात योग्य वाटले नाही म्हणून ते बंद केले.

हेही वाचाः कोका-कोला भारतात प्रथमच स्टार्टअपमध्ये गुंतवणूक करणार, स्विगी-झोमॅटोला टक्कर देणार

बिझनेस आयडिया कोरोना महामारीमध्ये चालली

२०२१ मध्ये दोन्ही मित्रांनी मिळून Zepto सुरू केले. यासाठी २०२१ मध्ये त्यांनी ८६ किराणा दुकानांशी सहकार्य केले आणि १० लाख ऑर्डर वितरीत केल्या. कंपनीच्या लॉन्चच्या ५ महिन्यांत मूल्यांकन ५७० दशलक्ष डॉलरवर पोहोचले. या यशासाठी आदित पालिचा आणि कैवल्य वोहरा यांचा ३० वर्षांखालील उद्योजकांच्या हुरुन यादीत समावेश करण्यात आला आहे. सध्या Zepto भारतातील १० प्रमुख शहरांमध्ये कार्यरत आहे. कंपनीत १,००० पर्यंत कर्मचारी काम करतात. हे प्लॅटफॉर्मवर ३,००० उत्पादने वितरीत करते. यामध्ये फळे, भाजीपाला ते किराणा मालाचा समावेश आहे. झेप्टोची खासियत म्हणजे तिची जलद वितरण सेवा आहे. हे सहसा १० ते १५-१६ मिनिटांत वितरित होते.

हेही वाचाः SBI कडून ‘अमृत कलश स्पेशल’ FD पुन्हा लाँच, योजनेत मिळतेय जबरदस्त व्याज

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 1200 crores earned at the age of 20 established a company worth crores in a year who is adit palicha vrd