पुणे : बँक ऑफ महाराष्ट्रला (महाबँक) सप्टेंबरअखेर तिमाहीत १,३२७ कोटी रुपयांचा नफा झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत बँकेच्या नफ्यात ४४ टक्क्यांची भरीव वाढ झाली आहे.

महाबँकेचे व्यवस्थापकीय संचालक निधू सक्सेना यांनी बँकेचे तिमाही निकाल मंगळवारी जाहीर केले. त्यानुसार, बँकेच्या निव्वळ व्याज नफ्यात ३.९८ टक्के वाढ झाली आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत ही वाढ ३.८८ टक्के होती. सार्वजनिक क्षेत्रातील १२ बँकांचा विचार करता महाबँकेचा निव्वळ व्याज नफा सर्वाधिक आहे. चालू आर्थिक वर्षात निव्वळ व्याज नफा ३.७५ ते ३.८५ टक्के राखण्यासह, आर्थिक वर्षातील निव्वळ नफा ५,००० कोटी रुपयांवर नेण्याचे उद्दिष्ट असल्याचे ते म्हणाले. गेल्या आर्थिक वर्षात बँकेने ४,०५५ कोटी रुपयांचा नफा कमावला होता.

silver truck mankhurd
मुंबई: मानखुर्द येथे चांदीचा ट्रक अडवला, ८० कोटींची आठ हजार ४७६ किलो वजनाची चांदी जप्त
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Mumbaikars contribution in mutual funds
म्युच्युअल फंडात मुंबईचाच सिंहाचा वाटा; १७.८३ लाख कोटींचे योगदान; मुंबईसह महाराष्ट्राच्या तुलनेत अन्य राज्यांत वाढती दरी
sale of illegal liquor pune, illegal liquor pune, pune,
पुणे : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेकायदा दारू विक्री प्रकरणी १२६७ गुन्हे दाखल
Reliance-Disney merger completed, Reliance-Disney,
रिलायन्स-डिस्ने यांचे ७०,३५२ कोटींचे महाविलीनीकरण पूर्ण
public banks profit increase by 26 percent in first half fy 25
सरकारी बँकांच्या नफ्यात सहामाहीत २६ टक्के वाढ
इक्विटी म्युच्युअल फंडात ऑक्टोबरमध्ये विक्रमी ४१,८८७ कोटींचा ओघ
rbi digital awareness loksatta
जनजागृतीवर ५९ कोटींचा खर्च, तरीही सर्वसामान्यांच्या २,८८० कोटींवर डल्ला…बँकेत तुमचे पैसे…

हेही वाचा >>>खाद्यान्नांच्या किमतीतील भडक्याने कहर; किरकोळ महागाई साडेपाच टक्क्यांच्या नऊमाही उच्चांकाला

महाबँकेने पहिल्या सहामाहीत २,५०० कोटी रुपयांचा निव्वळ मिळविला आहे. पुढील दोन तिमाहीतही नफ्यात याच गतीने वाढ अपेक्षित आहे. बँकेने जुलै ते सप्टेंबर या दुसऱ्या तिमाहीत ६,०१७ कोटी रुपयांचे व्याज उत्पन्न मिळविले असून, गेल्या वर्षी याच तिमाहीत ते ५,०६८ कोटी रुपये होते. बँकेचे निव्वळ व्याज उत्पन्न गेल्या वर्षीच्या तुलनेत १५.४१ टक्क्यांनी वाढून २,८०७ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. बँकेच्या निव्वळ बुडीत कर्जांचा दर ०.२३ टक्क्यांवरून ०.२० टक्क्यांवर खाली आला आहे, असे सक्सेना यांनी सांगितले.

महाबँकेचे तिमाही निकाल (जुलै ते सप्टेंबर)

– एकूण व्यवसाय – ४,९३,७९३ कोटी

– एकूण ठेवी – २,७६,२८९ कोटी

– कर्ज वितरण – २,१७,५०४ कोटी

– निव्वळ नफा – १,३२७ कोटी रुपये