चढ्या महागाईचा सुरू असलेला पाठलाग सोडवण्यासाठी ब्रिटनची मध्यवर्ती बँक असलेल्या बँक ऑफ इंग्लंडने सलग १३ व्यांदा कर्जावरील व्याजदरात वाढ गुरुवारी केली. आभाळाला पोहोचलेल्या महागाईत अपेक्षेप्रमाणे उतार दिसू शकला नसल्याने बहुतांश अर्थविश्लेषकांसाठी आश्चर्यकारक असा व्याजदर अर्धा टक्क्यांनी वाढवण्याचा हा निर्णय घेण्यात आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गुरुवारी एका निवेदनाद्वारे बँकेने स्पष्ट केले की, नऊ सदस्यीय पतधोरण निर्धारण समितीने मुख्य व्याजदर अर्धा टक्का वाढवून पाच टक्क्यांच्या पातळीवर नेला आहे. हा ब्रिटनमधील कर्जाच्या व्याजाचा १५ वर्षांतील उच्चांक स्तर आहे. विश्लेषकांनी व्याजदर वाढ अपेक्षिली असली तरी पाव टक्क्यांची असेल, असा अंदाज व्यक्त केला होता.

हेही वाचाः नफावसुलीने निर्देशांकांची शिखर पातळीवरून घसरण

वस्तू आणि सेवांच्या किमतींच्या दृष्टीने ब्रिटनमध्ये चिंताजनक स्थिती कायम आहे. महागाई दरात माफक का होईना पण ८.४ टक्क्यांपर्यंत घट होण्याचा विश्लेषकांचा अंदाज होता. प्रत्यक्षात बुधवारी जाहीर झालेल्या अधिकृत आकडेवारीवरून ब्रिटनमधील महागाईचा दर अनपेक्षितपणे ८.७ टक्क्यांवर स्थिर असल्याचे दिसून आले. उल्लेखनीय म्हणजे तुर्की, स्वित्झर्लंड आणि नॉर्वे या देशांमधील मध्यवर्ती बँकांनीही महागाईरोधी व्याजदर वाढीचे निर्णय गुरुवारी जाहीर केले.

हेही वाचाः अ‍ॅक्सिस बँकेच्या ग्राहकांसाठी खुशखबर, बँकेने सुरू केली नवी सेवा; तुम्हालाही फायदा होणार

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 13th consecutive interest rate hike in england bigger than expected rate hike to control inflation vrd
Show comments