PM Kisan Yojana : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान किसान सन्मान निधीचा १४ वा हप्ता जारी केला आहे. राजस्थानमधील सीकर येथील एका कार्यक्रमात त्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी दोन हजार रुपये पाठवणार असल्याचं सांगितलं आहे. पीएम किसान सन्मान निधी ही जगातील सर्वात मोठी योजना आहे, ज्यामध्ये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे पाठवले जातात, असंही १४ वा हप्ता जारी करताना ते म्हणाले. १४ व्या हप्त्यापर्यंत २ लाख ६० हजार कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पाठवले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर आलेला मेसेज तपासा

PM किसानचा १४ वा हप्ता जारी झाल्यानंतर योजनेत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर २ हजार रुपये हस्तांतरित केल्याचा मेसेज आलेला असेल.

मिनी स्टेटमेंट किंवा खाते बॅलन्स तपासू शकता

जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर हप्त्याचा मेसेज आला नसेल तर तुम्ही काही काळ वाट पाहू शकता. त्यानंतरही मेसेज आला नाही तर तुम्ही एटीएममध्ये जाऊन तुमचे मिनी स्टेटमेंट काढू शकता किंवा खात्यातील बॅलन्स तपासू शकता. याशिवाय पासबुकमध्ये एंट्री करून तुमच्या खात्यात पैसे आले आहेत की नाही हे देखील तुम्ही पाहू शकता.

हेही वाचाः ऑनलाइन गेमिंगवरील कराचा अंतिम निर्णय आता GST कौन्सिलच्या आगामी बैठकीत; २८ टक्के करावर चर्चा होणार

तुम्ही नेट बँकिंग किंवा मोबाईल बँकिंगद्वारेदेखील बॅलन्स तपासू शकता

जर तुम्ही नेट बँकिंग किंवा मोबाईल बँकिंगची सुविधा वापरत असाल तर तुम्ही तुमच्या खात्यातील शिल्लक किंवा खाते स्टेटमेंट स्वतःही ऑनलाइन तपासू शकता. याशिवाय तुम्ही तुमच्या बँकेच्या मिस्ड कॉल नंबरवर मिस्ड कॉल देऊन खात्यातील बॅलन्स जाणून घेऊ शकता.

हेही वाचाः बँकांनी नऊ वर्षांत १० लाख कोटींहून अधिक थकीत कर्जे केली वसूल : RBI

पीएम शेतकरी हेल्पलाइन नंबरवर संपर्क करू शकतात

जर तुमच्या खात्यात पैसे आले नाहीत, तर तुम्ही PM किसान हेल्पलाइन नंबर १५५२६१, PM किसान लँडलाइन नंबर ०११—२३३८१०९२, २३३८२४०१, PM किसान टोल फ्री नंबर १८००११५५२६६, PM किसान नवीन हेल्पलाइन ०११- २४३००६० किंवा email@kisanic60t. gov.in वर संपर्क करून माहिती मिळवू शकता.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 14th installment of kisan samman nidhi announced by prime minister narendra modi did you get the money in your account or not vrd