गेल्या काही दिवसांपूर्वीच रिलायन्स इंडस्ट्रीजमधून तिचा वित्तीय सेवा क्षेत्रातील उपक्रम ‘रिलायन्स स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेड’ विलग करण्यात आला आहे. विशेष म्हणजे कंपनीचे नाव ‘जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड’ असे बदलले असून, तिचे समभाग भांडवली बाजारात सूचिबद्ध करण्यात आले आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज (RIL) ने १५,५०० कोटी रुपये रोख आणि तरल गुंतवणूक Jio Financial Services (JFSL) मध्ये हस्तांतरित केली आहे, जी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या (RIL) वित्तीय सेवा व्यवसायांच्या विलगीकरणानंतर स्थापन झालेली नवीन फर्म आहे. हस्तांतरणानंतर JFSL कडे २०,७०० कोटी रुपयांची तरल संपत्ती आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रोख आणि तरल गुंतवणूक RIL च्या एकत्रित ताळेबंदातून जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेसकडे डिमर्जर योजनेचा भाग म्हणून हस्तांतरित करण्यात आली होती. म्हणून आता JFSL कडे RIL सहयोगी रिलायन्स सर्व्हिसेस अँड होल्डिंग्ज (RSHL) मधील रोख समतुल्यांसह एकूण २०,७०० कोटी रुपयांची तरल संपत्ती असेल, जे आता JFSL चा एक भाग आहे, असंही पोस्ट अर्निंग मीडिया आणि विश्लेषकांदरम्यान RIL CFO व्यंकटाचारी श्रीकांत म्हणालेत.

हेही वाचाः विदेशी गुंतवणूकदारांचा भारतीय बाजारावरील विश्वास कायम, जुलैमध्ये आतापर्यंत ४३,८०० कोटींची गुंतवणूक

जून तिमाहीच्या अखेरीस RIL चे थकीत कर्ज ३.१९ ट्रिलियन होते, जे मागील वर्षीच्या तिमाहीत नोंदवलेल्या २.६३ ट्रिलियनच्या तुलनेत २१.२९ टक्क्यांनी वाढले आहे. यापूर्वी ३० मार्च रोजी मुकेश अंबानींच्या नेतृत्वाखालील RIL ने आपला वित्तीय सेवा व्यवसाय रिलायन्स स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टमेंट्स (RSIL) मध्ये डिमर्ज करण्याची प्रक्रिया सुरू केली होती आणि त्याचे नामकरण JFSL असे केले होते. मेमध्ये या प्रक्रियेसाठी भागधारकांची मंजुरी मिळाली आणि नंतर जुलैमध्ये विलगीकरणासाठी नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलची मंजुरी मिळाली.

हेही वाचाः Money Mantra : ICICI ने नवीन फंड उघडला, फक्त १००० रुपयांपासून करता येणार गुंतवणूक

विलगीकरणानंतर JFSL सहा कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणार आहे. रिलायन्स इंडस्ट्रियल इन्व्हेस्टमेंट्स अँड होल्डिंग्ज, रिलायन्स पेमेंट सोल्युशन्स, जिओ पेमेंट्स बँक, रिलायन्स रिटेल फायनान्स, जिओ इन्फॉर्मेशन एग्रीगेटर सर्व्हिसेस आणि रिलायन्स रिटेल इन्शुरन्स ब्रोकिंग त्यांचा यात समावेश आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 15500 crore transferred from reliance industries to jio financial services vrd