LPG Gas Cylinder Price Today : LPG च्या घरगुती ग्राहकांना दिलासा दिल्यानंतर आता मोदी सरकारने व्यावसायिक सिलिंडर वापरकर्त्यांना मोठा दिलासा दिला आहे. आजपासून १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरचे दर कमी करण्यात आले आहेत. दिल्लीत व्यावसायिक सिलिंडरची किंमत १५८ रुपयांनी कमी होऊन आता १५२२.५० रुपये झाली आहे. हे दर आजपासून म्हणजेच १ सप्टेंबरपासून लागू झाले आहेत.
दिल्लीत हे १६८० रुपयांऐवजी १५२२.५० रुपयांना तर कोलकातामध्ये आजपासून १८९२.५० रुपयांऐवजी १६३६ रुपयांना मिळेल. तसेच यापूर्वी त्याची मुंबईत किंमत १६४०.५० रुपये होती ती आता १४८२ रुपयांपर्यंत खाली आली आहे.
हेही वाचाः LPG Gas Price : मोठी बातमी! घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात २०० रुपयांची कपात
मंगळवारी स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या (एलपीजी) किमतीत २०० रुपयांनी कपात करण्यात आली होती. सरकारच्या या नव्या निर्णयानंतर आता एलपीजी सिलिंडरच्या (१४.२ किलो) किमतीत मोठे बदल करण्यात आले आहेत. देशाची राजधानी दिल्लीत आता १४.२ किलोचे घरगुती एलपीजी सिलिंडर ९०३ रुपयांना विकले जात आहेत. ग्राहकांना आता २०० रुपयांनी स्वस्त सिलिंडर मिळत आहेत.
हेही वाचाः विश्लेषण : सिलिंडरपाठोपाठ मोदी सरकार आता पेट्रोल-डिझेल स्वस्त करण्याच्या तयारीत?
या निर्णयामुळे सरकारवर ७५०० कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार
२०० रुपये प्रति सिलिंडरच्या अतिरिक्त सबसिडीला मान्यता देण्यात आली आहे, परंतु सबसिडीचा भार केवळ ऑइल मार्केटिंग कंपन्यांवर (OMCs) पडणार नाही. या अनुदानाचा भारही सरकार उचलणार आहे. सरकारवर किती बोजा पडेल आणि ओएमसीवर किती बोजा पडेल, याचा खुलासा करण्यात आलेला नाही. पण किमती कमी करण्याच्या निर्णयामुळे सरकारवर ७५०० कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार असल्याचे समजतेय.