पीटीआय, नवी दिल्ली

सरलेल्या ऑक्टोबर महिन्यात देशाची व्यापारी मालाची निर्यात १७.२५ टक्क्यांनी वधारून ३९.२ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे, जी मागील वर्षीच्या याच महिन्यात ३३.४३ अब्ज डॉलर होती, अशी माहिती गुरुवारी वाणिज्य मंत्रालयाने दिली. निर्यातीच्या तुलनेत आयातीमध्ये मात्र किरकोळ वाढ झाली आहे. ऑक्टोबरमध्ये आयात ३.९ टक्क्यांनी वाढून ६६.३४ अब्ज डॉलर झाली आहे, जी मागील वर्षीच्या कालावधीत ६३.८६ अब्ज डॉलर होती.

Indian rupee latest marathi news
रुपयाची प्रतिडॉलर ८५ च्या दिशेने वाटचाल
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
indian stock market nifty sensex
अमेरिकी महागाई दराच्या प्रतीक्षेत निर्देशांकात नगण्य वाढ
Cow milk subsidy of Rs 57 crores to farmers in Satara news
साताऱ्यातील शेतकऱ्यांना ५७ कोटींचे गायीच्या दुधाचे अनुदान
Mahindra Thar Earth Edition With More Than 3 Lakh Rupees Discount, See Thar Other Variant Offers
महिंद्रा थारवर मिळतेय ३ लाखांपर्यंत सूट; थार प्रेमींनो आत्ताच उचला संधीची फायदा, जाणून घ्या ऑफर्स डिटेल्स
11 December Latest Petrol Diesel Price
Daily Petrol Diesel Price :तुमच्या शहरांत पेट्रोल-डिझेल स्वस्त की महाग? एक लिटर इंधनासाठी किती रुपये मोजावे लागणार?
Amrit Jyeshtha Nagarik yojna and Mahila Samman Yojana led to increased ST Pune Division Revenue
एसटी भरधाव ! महिला सन्मान याेजनेतून किती केली कमाई ?
cocaine smuggling in india
कोकेनसह अवैध वस्तूंच्या तस्करीसाठी केसांचे विग अन् पुस्तकांचा वापर; भारतात तस्करीत वाढ होण्यामागील कारणे काय?

या कालावधीत मात्र व्यापार तूट, म्हणजेच आयात आणि निर्यातीमधील तफावत २७.१४ अब्ज डॉलर नोंदवली गेली आहे. सप्टेंबरमध्ये भारताची व्यापारी निर्यात केवळ ०.५ टक्क्यांनी किरकोळ वाढून ३४.५८ अब्ज डॉलर झाली होती. तर विद्यमान आर्थिक वर्षातील एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत निर्यात ३.१८ टक्क्यांनी वाढून २५२.५८ अब्ज डॉलर आणि आयात ५.७७ टक्क्यांनी वाढून ४१६.९३ अब्ज डॉलर झाली आहे.

हेही वाचा – एचडीएफसी पाठोपाठ स्टेट बँकेकडून कर्ज महाग

सरकारकडून मिळत असलेले पाठबळ आणि निर्यातदारांकडून सुरू असलेल्या स्पर्धात्मक उत्पादनांमुळे ८०० अब्ज डॉलरचा निर्यात टप्पा शक्य होईल अशी वाणिज्य मंत्रालयाला आशा आहे. भू-राजकीय स्थिती आव्हानात्मक असतानाही विकसनशील आणि विकसित अर्थव्यवस्थांमधून भारतीय निर्यातदारांना चांगले कार्यादेश मिळत आहेत.

हेही वाचा – मंदीवाल्यांचा जोर कायम; ‘सेन्सेक्स’मध्ये ११० अंशांची घसरण

निर्यातीसाठी सरलेला ऑक्टोबर महिना अत्युत्तम ठरला. निर्यातीमधील वाढ अशीच कायम राहिल्यास या वर्षी ८०० अब्ज डॉलरचा टप्पा नक्कीच गाठला जाईल. – सुनील बर्थवाल, केंद्रीय वाणिज्य सचिव

Story img Loader