मुंबई : भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात एलआयसीचे अध्यक्ष सिद्धार्थ मोहंती यांनी गुरुवारी नवी दिल्लीत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेऊन त्यांना १,८३१.०९ कोटी रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. २२ ऑगस्ट रोजी वार्षिक सर्वसाधारण सभेत भागधारकांनी मंजूर केलेल्या लाभांशानुरूप भारत सरकारचा हिस्सा म्हणून हा धनादेश देण्यात आल्याचे एलआयसीने प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. अर्थमंत्र्यांची भेट घेताना, मोहंती यांच्या सोबत एलआयसीचे चार व्यवस्थापकीय संचालकही उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आणखी वाचा-पाण्यावर पैसा खर्च करून हायड्रोजन इंधन तयार करा – गडकरी; ‘अशोक लेलॅन्ड’चा अमृतमहोत्सवी कार्यक्रम

सन फार्माच्या ४,६९९ कोटी मूल्याच्या समभागांची विक्री

एलआयसीने औषधी निर्माण क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या सन फार्मामधील २ टक्के समभागांची विक्री केली. एलआयसीने २२ जुलै २०२२ ते १३ सप्टेंबर २०२३ दरम्यान खुल्या बाजारात सन फार्माच्या समभागांची विक्री करून ४,६९९ कोटी रुपये मिळविले आहेत. या कालावधीत समभागांची प्रत्येकी सरासरी ९७३.८० रुपये किमतीला करण्यात आली. यातून तिची कंपनीतील हिस्सेदारी आता ५.०२३ टक्क्यांवरून कमी होऊन ३.०१२ टक्क्यांवर आली आहे. गुरुवारच्या सत्रात सन फार्माचा समभाग अर्ध्या टक्क्यांच्या घसरणीसह १,१४३.८० रुपयांवर स्थिरावला.