मुंबई: भारतात विदाचोरीमुळे पडणारा सरासरी आर्थिक भुर्दंड २०२० ते २०२३ या तीन वर्षांत २८ टक्क्यांनी वाढून २० लाख डॉलरवर पोहोचल्याचे रिझर्व्ह बँकेच्या अहवालाने सोमवारी स्पष्ट केले. हा भुर्दंड नेमका कोणत्या प्रकारचा आणि तो कोणाच्या वाट्याला आला, हा तपशील अहवालातून मात्र देण्यात आलेला नाही.

रिझर्व्ह बँकेच्या अहवालानुसार, सर्व उद्योगांमध्ये सायबर हल्ल्यांच्या बाबतीत वाहन उद्योग सर्वाधिक लक्ष्य होत आहे. त्याखालोखाल बँकिंग व वित्तीय सेवा क्षेत्राचा क्रमांक आहे. बँकिंग व वित्तीय सेवा क्षेत्रावरील नियमन अधिक सुस्पष्ट असल्याने सायबर हल्ल्यांपासून त्याचे संरक्षण होत आहे. ‘फिशिंग’ म्हणजेच फसवे आणि बनावट ई-मेल आणि मोबाइलवर संदेश पाठवून केल्या जाणाऱ्या फसवणुकीचे प्रमाण सर्वाधिक २२ टक्के आहे. त्यानंतर नागरिकांची माहिती आणि ओळख चोरी करून त्याद्वारे फसवणुकीचे प्रमाण १६ टक्के आहे.

Economy Growth rate likely to fall to 6 4 percent
अर्थव्यवस्थेची वाढ मंदावणार! विकासदर ६.४ टक्क्यांपर्यंत घसरण्याची शक्यता
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Mumbai, Increase in PM 2.5 levels,
मुंबईत पीएम २.५ च्या पातळीत वाढ
Image of Indian economy graphics or related visuals
भारताचा GDP यंदा ६.४ टक्क्यांवर घसरण्याची शक्यता : सरकारचा अंदाज
State Bribery Prevention Department bribery
राज्यात भ्रष्टाचाराचे ७१३ गुन्हे! नाशिकमध्ये सर्वाधिक तर मुंबईत सर्वात कमी गुन्हे! २०१४ पासून गुन्ह्यांत घट
state bank of india poverty rate
देशात अतिदारिद्र्याचे नाममात्र अस्तित्व, स्टेट बँक संशोधन टिपणाचा दावा
Bombil , Saranga, low visibility , fish price ,
कमी दृश्यमानतेमुळे मासळीही दिसेनाशी; यंदाच्या वर्षी सरंगा, बोंबिलाच्या दरात ७० टक्क्यांनी वाढ
Indian rupee fall by 85 79 rupees
रुपयाची झड ८५.७९ पर्यंत

हेही वाचा >>>Home Loan on Digital Payment History: आता नोकरदार नसणाऱ्यांनाही सहज मिळणार गृहकर्ज! डिजिटल पेमेंट हिस्ट्रीचा असेल निकष; अर्थमंत्रालयाकडून मोठी अपडेट

भारतात डिजिटल अर्थव्यवस्थेचा विस्तार अतिशय वेगाने होत आहे. त्यामुळे सायबर हल्लेही वाढू लागले आहेत. जागतिक पातळीवर २०२३ मध्ये सायबर हल्ल्यांमुळे ८.१५ लाख कोटी डॉलरचा फटका बसला. हा आकडा २०२८ पर्यंत १३.८२ लाख कोटी डॉलरवर जाणे अपेक्षित आहे. जागतिक पातळीवर विदाचोरीमुळे गेल्या वर्षी ४४.५ लाख डॉलरचा फटका बसला. गेल्या तीन वर्षांत त्यात १५ टक्के वाढ झाली आहे. यामुळे सर्वच मध्यवर्ती बँकांनी २०२० पासून सायबर सुरक्षेवरील आर्थिक तरतूद ५ टक्क्यांनी वाढविली आहे, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.

Story img Loader