जी २० बैठकीसाठी येणाऱ्या जागतिक नेत्यांच्या स्वागतासाठी दिल्ली सज्ज झाली आहे. रस्ते, चौक आणि उद्याने ते भारत मंडपम या मुख्य स्थळापर्यंत संपूर्ण देश उत्सवाच्या मूडमध्ये पाहायला मिळतो आहे. कृष्ण जन्माष्टमीसारख्या शुभ मुहूर्तावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यासह अनेक जागतिक नेते भारतात पोहोचू लागले आहेत. खरं तर जी २० हा ५ दिवसांचा कार्यक्रम असला तरी गेल्या एका वर्षात भारताला अध्यक्षपद मिळाल्यापासून देशाच्या अर्थव्यवस्थेतही बदल झाला आहे. भारताने जी २० चे अध्यक्षपद हे जागतिक स्तरावर आपली आर्थिक शक्ती तसेच सॉफ्ट पॉवरचे प्रदर्शन करण्याचे साधन बनवले असल्याचं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. म्हणूनच देशाच्या कानाकोपऱ्यात जी २०शी संबंधित सुमारे २२० बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत. यामध्ये देशातील २८ राज्ये आणि ८ केंद्रशासित प्रदेशातील ६० शहरांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आणि जगातील विविध देशांमधून पाहुणे भारतात यायला लागले आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा