लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी
मुंबई : सामान्य विमा क्षेत्रातील सरकारी मालकीची कंपनी असलेल्या जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशनच्या (जीआयसी) आंशिक भागभांडवली हिस्सा विक्री अर्थात ऑफर फॉर सेलसाठी (ओएफएस) संस्थात्मक गुंतवणूकदारांनी बुधवारी सुमारे २,३०० कोटी रुपयांच्या बोली लावल्या.

विद्यमान आर्थिक वर्षातील पहिली सरकारी निर्गुंतवणूक असलेल्या जीआयसीच्या ‘ओएफएस’ला गुंतवणूकदारांकडून कमी प्रतिसाद दिसून आला. मुंबई शेअर बाजारच्या आकडेवारीनुसार, बाजाराच्या कामकाजाचा कालावधी संपण्याआधी ‘ओएफएस’चा भरणा पूर्ण झाला. बिगर किरकोळ गुंतवणूकदारांकडून ५.८१ कोटी समभागांची बोली प्राप्त झाली. जे त्यांच्यासाठी राखीव ठेवण्यात आलेल्या ५.३५ कोटी समभागांच्या १०८.४९ टक्के आहे. आता किरकोळ गुंतवणूकदारांना गुरुवारी ओएफएससाठी बोली लावता येईल. जीआयसीने प्रति समभाग ३९५ रुपये किंमत निश्चित केली आहे. कंपनीने ग्रीन-शूचा अर्थात अधिक भरणा झाल्यास तो राखून ठेवण्याचा पर्यायदेखील निश्चित केला आहे. त्यामुळे ‘ओएफएस’च्या माध्यमातून ६.७८ टक्क्यांपर्यंत समभाग विक्री केली जाऊ शकते.

Information that 183 buses are closed every day in the state of Maharashtra
एसटी बसमध्ये वारंवार बिघाड… रोज १८३ बसच्या प्रवाश्यांना अडचण…
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Chief Minister Fadnavis instructs to provide various services without delay District Good Governance Index Report released
विविध सेवा विनाविलंब उपलब्ध करा; मुख्यमंत्री फडणवीस यांची सूचना; जिल्हा सुशासन निर्देशांक अहवालाचे प्रकाशन
Pune Municipal Corporation construction department issued notices to 125 construction projects in the city and stopped work Pune print news
पुणे: बांधकाम बंद ठेवण्याच्या नोटिशींचा ‘फार्स’ ?
share market Major indices, share market ,
स्फुरणाअभावी निर्देशांकांना सुस्ती
chhatrapati Sambhajinagar sports complex scam
१३ हजार पगार असलेल्या कर्मचाऱ्याने घातला २१ कोटींचा गंडा; प्रेयसीला दिला ४ बीएचकेचा फ्लॅट, स्वतः घेतल्या आलिशान गाड्या
Pune railway station, Pune railway station waiting time,
पुणे : रेल्वे प्रवाशांचा स्थानकावरील प्रतिक्षाकाळ कमी होणार, आराखडा अंतिम टप्प्यात
pune speed breakers
पुण्यातील ‘इतके’ स्पीड ब्रेकर काढणार ? कारण काय

हेही वाचा >>>Stock Market Today : ‘निफ्टी’ची १४ सत्रांतील अविरत तेजीनंतर माघार; ‘सेन्सेक्स’मध्ये दोन शतकी घसरण

समभाग कोसळला

जीआयसीच्या ‘ओएफएस’ला संस्थात्मक गुंतवणूदारांकडून कमी प्रतिसाद मिळाल्याने बुधवारच्या सत्रात समभाग ५.६४ टक्क्यांची घसरण झाली. दिवसअखेर तो २३.८० रुपयांच्या घसरणीसह ३९७.८५ रुपयांवर बंद झाला. सध्याच्या शेअरच्या बाजारभावानुसार, कंपनीचे ६९,७९८ कोटी रुपयांचे बाजार भांडवल आहे.

Story img Loader