ॲमेझॉन पे (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेडला रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी ३.०६ कोटी रुपयांचा दंड ठोठावला. नियमांचे पालन न केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली.
हेही वाचा- सेवा क्षेत्राची उत्साही कामगिरी; फेब्रुवारीत तब्बल १२ वर्षांतील उच्चांकी मजल
ई-कॉमर्स क्षेत्रातील आघाडीच्या ॲमेझॉन इंडियाच्या मालकीची ॲमेझॉन पे हे एक डिजिटल देयक व्यवहार व्यासपीठ आहे. ‘प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट्स (पीपीआय)’ आणि ‘नो युअर कस्टमर (केवायसी)’ याबाबतच्या रिझर्व्ह बँकेच्या नियमांचा भंग केल्याचा ठपका ‘ॲमेझॉन पे’वर ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी रिझर्व्ह बँकेने आधी कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावून दंडात्मक कारवाई का करू नये, अशी विचारणाही केली होती.
हेह वाचा- जागितक बँकेवरील अजय बंगा यांच्या नामांकनाला भारताचा पाठिंबा – अर्थ मंत्रालय
ॲमेझॉन पेने प्रतिसादादाखल दिलेल्या उत्तराचे परीक्षण केल्यानंतर नियमांच्या पालनांत हयगय झाल्याचे सिद्ध झाले. त्यामुळे दंडात्मक कारवाईचा निर्णय घेण्यात आला आहे. कंपनीला केलेला दंड हा नियामक चौकटीचे पालन न केल्याने ठोठावण्यात आला आहे. यातून ॲमेझॉन पे आणि तिचे ग्राहक यांच्यातील व्यवहारांच्या वैधतेसंबंधाने कोणतेही भाष्य करण्यात आलेले नाही.