मुंबई : सायंट डीएलएम, हेल्थविस्टा आणि झॅगल प्रीपेड ओशन सर्व्हिसेस या तीन कंपन्यांना भांडवली बाजार नियामक ‘सेबी’कडून प्रारंभिक समभाग विक्रीसाठी (आयपीओ) बुधवारी मंजुरी मिळाली आहे.

हेही वाचा >>> ऐकावं ते नवलच! ४४ कोटींची लॉटरी जिंकली, पण कॉल करणाऱ्याला फेक समजून केलं ब्लॉक आणि मग…

Aditi Tatkare, Ladki Bahin Yojana, Ladki Bahin Yojana Fund, Fund Issue, Aditi Tatkare Pune,
लाडक्या बहीण योजनेसाठी इतर कोणत्याही विभागाचा निधी वळविण्यात आलेला नाही – मंत्री आदिती तटकरे
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
77 lakh fraud by cyber thieves, lure of investment ,
पुणे : गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांकडून ७७ लाखांची फसवणूक
Fair Play Betting App, IPL Broadcast , ED ,
फेअर प्ले बेटिंग अ‍ॅप आयपीएल बेकायदा प्रक्षेपण प्रकरण: ईडीकडून आतापर्यंत ३३५ कोटी रुपयांच्या मालमत्तेवर टाच
three day book Exhibition held on occasion of Granthali Readers Day attracting over 3000 visitors from Thane
चरित्र ग्रंथ, कवितासंग्रह सह वैचारिक विषयांवरील पुस्तकांना ठाणेकरांची पसंती
Chief Minister Fadnavis instructs to provide various services without delay District Good Governance Index Report released
विविध सेवा विनाविलंब उपलब्ध करा; मुख्यमंत्री फडणवीस यांची सूचना; जिल्हा सुशासन निर्देशांक अहवालाचे प्रकाशन
navi mumbai cyber crime
यंदा नवी मुंबईत १ अब्ज ३७ कोटींहून अधिक रुपयांची सायबर लूट
Mumbai ED filed supplementary charge sheet against OctaFX and other related entities
ऑक्टाएफएक्स प्रकरण : ईडीकडून पुरवणी आरोपपत्र दाखल, देशातील व्यवहारांतून ८०० कोटी जमा केल्याचा आरोप

सेबीकडे सादर करण्यात आलेल्या मसुदा प्रस्तावानुसार, विद्युत वस्तूचे उत्पादन आणि सेवा क्षेत्राशी संबंधित असणारी सायंट डीएलएम प्रारंभिक समभाग विक्रीसाठी ७४० कोटी रुपयांच्या नवीन समभागांची विक्री करणार आहे. तर कंपनीच्या माध्यमातून उभारण्यात आलेला निधीचा वापर वाढीव भांडवली गरजा, भांडवली खर्च, कर्ज परतफेड आणि सामान्य कॉर्पोरेट उद्देशांच्या पूर्ततेसाठी करण्यात येणार आहे. आरोग्य सेवा क्षेत्रातील अग्रणी हेल्थविस्टा इंडिया २००० कोटी रुपये मूल्यांच्या नवीन आणि आंशिक हिस्साविक्रीच्या (ओएफएस) माध्यमातून ५.६ कोटी समभागांची विक्री करणार आहे.

हेही वाचा >>> Gold Rates Today : सोन्यामध्ये जबरदस्त उसळी, गाठला नवा उच्चांक, तोळ्याचा भाव काय?

आयपीओच्या माध्यमातून कंपनीचा सुमारे १,००० कोटी रुपयांचा निधी उभारण्याचा मानस आहे. नवीन समभागांच्या विक्रीतून मिळणारा निधी हेल्थविस्टा इंडियाची उपकंपनी असणाऱ्या मेडीबिझ फार्मा, नवीन वैद्यकीय उपकरणे खरेदी, कर्जाची परतफेड करण्यासाठी मुख्यतः करण्यात येईल. तर तंत्रज्ञान आधारित वित्त कंपनी झॅगल प्रीपेड ओशन सर्व्हिसेस ४९० कोटी रुपये मूल्याच्या नवीन समभागांची आणि ओएफएसच्या माध्यमातून १.०५ कोटी समभागांची विक्री करणार आहे.

Story img Loader