जगातील सर्वाधिक वृद्धांची लोकसंख्या असलेल्या जपानमध्ये ३२ वर्षीय शुनसाकू सागामी आता अब्जाधीश झाला आहे. जगभरात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) च्या मदतीने एकापेक्षा जास्त विक्रम केले जात आहेत. असेच एक प्रकरण जपानमधूनही समोर येत आहे. Shunsaku ने कृत्रिम बुद्धिमत्ता(AI)च्या मदतीने ९५० दशलक्ष डॉलर (७,८२६ कोटी) एवढी संपत्ती निर्माण केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कसा केला चमत्कार?

मशिन आणि तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करून शुन्साकू सागामीने लहान आणि मध्यम आकाराच्या कंपन्यांमधील सेवानिवृत्त व्यक्तींना एआय आणि डेटाबेस वापरून त्यांच्या संशोधन संस्थेसाठी करार करण्यासाठी नियुक्त केले आहे.

कंपनीचे मूल्य ७ पटीने वाढले

ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार, टोकियोमध्ये गेल्या जूनमध्ये शुन्साकू सगामीच्या M&A संशोधन संस्थेच्या होल्डिंगमध्ये सातपट वाढ झाली आहे, ज्यामुळे सागामीला ९५० दशलक्ष डॉलर (७,८२६ कोटी) ची संपत्ती मिळाली आहे.

हेही वाचाः अदाणी फाऊंडेशन मेटाव्हर्सच्या माध्यमातून कौशल्य शिकवणार, विद्यार्थ्यांना मिळणार आभासी अनुभव

व्यवसाय कसा वाढला?

खरं तर जपानमध्ये जगातील सर्वात जास्त वृद्ध लोक आहेत, तेथील उद्योगपतींना त्यांचे उत्तराधिकारी मिळत नाहीत, त्यामुळे अनेक व्यवसाय बंद करावे लागतात. ही समस्या शुन्साकू सागामी यांनाही आली, जेव्हा त्यांच्या वडिलांना उत्तराधिकारी न मिळाल्याने रिअल इस्टेट व्यवसाय बंद करावा लागला. M&A संशोधन संस्थेच्या मते, जपानमधील ६२०,००० फायदेशीर उद्योग उत्तराधिकारी नसल्यामुळे बंद होण्याचा धोका आहे. सरकारचा अंदाज आहे की, २०२५ पर्यंत ७० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मालकांसह २.५ दशलक्ष लहान आणि मध्यम आकाराच्या कंपन्या असतील. त्यापैकी जवळपास निम्म्याकडे भविष्यासाठी कोणतीही योजना नाही, ज्यामुळे कंपन्या बंद होऊ शकतात आणि ६.५ दशलक्ष नोकर्‍या नष्ट होऊ शकतात, जीडीपीमध्ये २२ ट्रिलियन येन (२२२ अब्ज डॉलर) खर्च होतील.

हेही वाचाः भारताच्या ‘या’ डावपेचाने चीन गारद; आयातीत २३ टक्क्यांहून अधिक घट

M&A संशोधन संस्था पाच वर्षांपूर्वी स्थापन झाली

५ वर्षांमध्ये M&A संशोधन संस्था ११५ सल्लागारांसह १६० हून अधिक कर्मचार्‍यांपर्यंत वाढली आहे. तसेच अंदाजे ५०० डील आहेत. मार्चपर्यंत ६२ व्यवहार पूर्ण झाले आहेत. सप्टेंबर २०२० ला संपलेल्या आर्थिक वर्षात विक्री फक्त ३७६ दशलक्ष येन होती.

कंपनी पैसे कसे कमावते?

व्यवहार बंद झाल्यावर कंपनीला पैसे मिळतात. ५०० दशलक्ष येन किंवा त्यापेक्षा कमी किमतीच्या डीलसाठी कंपनी ५ टक्क्यांपर्यंत शुल्क आकारते. आकडेवारीनुसार, नव्या तिमाहीत त्यांची सरासरी ६० दशलक्ष येन प्रति विक्री होती.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 32 year old boy became a billionaire with the help of artificial intelligence earned wealth of 7826 crores vrd