नवी दिल्ली : भारताने मुक्त व्यापार करार केलेल्या संयुक्त अरब अमिराती, दक्षिण कोरिया आणि ऑस्ट्रेलिया यासह इतर देशांतून आयातीचे प्रमाण आर्थिक वर्ष २०१८-१९ ते २०२३-२४ या पाच वर्षांत ३८ टक्क्यांनी वाढले आहे. या देशांतून भारताची आयात सरलेल्या आर्थिक वर्षात १८७.९२ अब्ज डॉलरवर पोहोचली, अशी माहिती ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्ह (जीटीआरआय) या विचारमंचाने सोमवारी दिली.

जीटीआरआयने दिलेल्या माहितीनुसार, मुक्त व्यापार करार करण्यात आलेल्या देशांसोबत भारताच्या निर्यातीतही वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये १२२.७२ अब्ज डॉलरवर पोहोचलेली निर्यात ही २०१८-१९ मध्ये १०७.२० अब्ज डॉलर होती. म्हणजेच पाच वर्षांच्या काळात त्यात १४.४८ टक्के वाढ नोंदविण्यात आली. मुक्त व्यापार करार केलेल्या देशांतून गेल्या पाच वर्षांत भारताची आयात ३७.९७ टक्क्यांनी वाढली असून, ती १३६.२० अब्ज डॉलरवरून १८७.९२ अब्ज डॉलरवर गेली आहे. मुक्त व्यापार कराराचा भारताच्या परराष्ट्र व्यापारावर लक्षणीय परिणाम झाल्याचे यातून दिसून येत आहे.

हेही वाचा >>> शान्येतील राज्यांच्या म्युच्युअल फंडांतील मालमत्तेत दुपटीने वाढ

संयुक्त अरब अमिरातीला भारताची निर्यात पाच वर्षांत १८.२५ टक्क्यांनी वाढली असून, ती ३०.१३ अब्ज डॉलरवरून ३५.६३ अब्ज डॉलरवर गेली आहे. याचवेळी संयुक्त अरब अमिरातीतून भारताची आयात ६१.२१ टक्क्यांनी वाढली असून, ती २७.७९ अब्ज डॉलरवरून ४८.०२ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. भारताचा या देशासोबत मुक्त व्यापार करार मे २०२२ पासून लागू झाला. भारताचा ऑस्ट्रेलियासोबत मुक्त व्यापार करार डिसेंबर २०२२ मध्ये लागू झाला. गेल्या पाच वर्षांत भारताची ऑस्ट्रेलियाला निर्यात दुपटीने वाढली असून, ती ३.५२ अब्ज डॉलरवरून ७.९४ अब्ज डॉलर झाली आहे. याचवेळी ऑस्ट्रेलियातून आयात २३.०६ टक्क्यांनी वाढली असून, ती १३.१३ अब्ज डॉलरवरून १६.१६ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे.
असियान समूहातील १० देशांमध्ये भारताची निर्यात गेल्या पाच वर्षांत १० टक्क्यांनी वाढली असून, ती ३७.४७ अब्ज डॉलरवरून ४१.२१ अब्ज डॉलरवर गेली आहे. याचवेळी या देशांतून आयात ३४.३ टक्क्यांनी वाढली असून, ती ५९.३२ अब्ज डॉलरवरून ७९.६७ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

जागतिक व्यापारात केवळ १.८ टक्के हिस्सा

जागतिक पातळीवर निर्यातीत भारत हा १७ व्या क्रमांकावर असून, जागतिक निर्यातीतील देशाचा वाटा केवळ १.८ टक्के आहे. याचवेळी जागतिक पातळीवर आयातीत भारत आठव्या स्थानी असून, जागतिक आयातीतील वाटा २.८ टक्के आहे. गेल्या आर्थिक वर्षात भारताची वस्तू निर्यात ३.११ टक्क्यांनी कमी होऊन, ४३७.१ अब्ज डॉलर झाली आणि आयात ५.४ टक्क्यांनी कमी होऊन ६७७.२ अब्ज डॉलर झाली.

Story img Loader