नवी दिल्ली : भारताने मुक्त व्यापार करार केलेल्या संयुक्त अरब अमिराती, दक्षिण कोरिया आणि ऑस्ट्रेलिया यासह इतर देशांतून आयातीचे प्रमाण आर्थिक वर्ष २०१८-१९ ते २०२३-२४ या पाच वर्षांत ३८ टक्क्यांनी वाढले आहे. या देशांतून भारताची आयात सरलेल्या आर्थिक वर्षात १८७.९२ अब्ज डॉलरवर पोहोचली, अशी माहिती ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्ह (जीटीआरआय) या विचारमंचाने सोमवारी दिली.
जीटीआरआयने दिलेल्या माहितीनुसार, मुक्त व्यापार करार करण्यात आलेल्या देशांसोबत भारताच्या निर्यातीतही वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये १२२.७२ अब्ज डॉलरवर पोहोचलेली निर्यात ही २०१८-१९ मध्ये १०७.२० अब्ज डॉलर होती. म्हणजेच पाच वर्षांच्या काळात त्यात १४.४८ टक्के वाढ नोंदविण्यात आली. मुक्त व्यापार करार केलेल्या देशांतून गेल्या पाच वर्षांत भारताची आयात ३७.९७ टक्क्यांनी वाढली असून, ती १३६.२० अब्ज डॉलरवरून १८७.९२ अब्ज डॉलरवर गेली आहे. मुक्त व्यापार कराराचा भारताच्या परराष्ट्र व्यापारावर लक्षणीय परिणाम झाल्याचे यातून दिसून येत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा