IMF Report : आंतरराष्ट्रीय नाणेनिधी(International Monetary Fund)ने आर्टिफिशियल इंटेलिजन्स(Artificial intelligence)च्या धोक्यांबाबत जगाला इशारा दिला आहे. IMF च्या अंदाजानुसार, जगातील ४० टक्के नोकऱ्या एआयमुळे धोक्यात येणार आहेत. विकसित देशांवर त्याचा प्रभाव ६० टक्क्यांपर्यंत असू शकतो. जे लोक एआयच्या हल्ल्यापासून वाचले आहेत, त्यांना कमी पगार आणि नोकऱ्यांच्या अभावाचा सामना करावा लागणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सर्व देशांनी लोकांना सामाजिक सुरक्षा देण्याची तयारी ठेवावी

IMF च्या अंदाजानुसार, AI च्या आगमनाने उत्पादकता वाढण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे नोकरीत असलेल्या लोकांना खूप फायदा होणार आहे. अनेक प्रकारच्या नोकर्‍या कायमस्वरूपी गायब होण्याची शक्यता आहे. AI आणि मशीन लर्निंगवर नवीन अहवाल जारी करताना IMF ने म्हटले आहे की, तंत्रज्ञान देशांमधील असमानता वाढवू शकते. शिवाय समाजावरही त्याचा विपरीत परिणाम होणार आहे. त्यामुळे लोकांना सामाजिक सुरक्षा देण्यासाठी सर्व देशांनी पूर्ण तयारी करणे अत्यंत आवश्यक आहे. कर्मचाऱ्यांच्या कौशल्य विकासाकडेही लक्ष दिले पाहिजे.

हेही वाचाः पाकिस्तानातील महागाईने सर्वसामान्यांचे केले हाल; १२ अंडी ४०० रुपयांना, तर कांद्याची किंमत ऐकून डोळे पाणावतील

जग तांत्रिक क्रांतीच्या उंबरठ्यावर उभे

IMF च्या MD क्रिस्टालिना जॉर्जिएवा (Kristalina Georgieva) म्हणाल्या की, आम्ही तांत्रिक क्रांतीच्या उंबरठ्यावर उभे आहोत. यामुळे उत्पादकता वाढेल, जागतिक विकासाला गती मिळेल आणि जगभरातील उत्पन्न वाढेल. पण नोकऱ्या गमावण्याचा धोका नाकारता येत नाही. एआयमुळे जास्त पगाराच्या नोकऱ्याही धोक्यात येतील. जॉर्जिव्हा म्हणाल्या की, यापूर्वीही ऑटोमेशन आणि आयटीचा नोकऱ्यांवर नकारात्मक परिणाम झाला आहे. पण AI या सर्वांपेक्षा वेगळे आहे. उच्च कुशल नोकऱ्यांवरही याचा नकारात्मक परिणाम होणार आहे.

हेही वाचाः Jyoti CNC Listing : ज्योती सीएनसी ऑटोमेशनच्या IPO ची बाजारात दमदार एन्ट्री, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल

जुन्या कर्मचाऱ्यांना खऱ्या अडचणींचा सामना करावा लागेल

IMF ला काळजी आहे की, विकसित अर्थव्यवस्था वेगाने AI स्वीकारतील. सिंगापूर, अमेरिका आणि डेन्मार्क यांसारखे देश AI स्वीकारण्यात इतरांपेक्षा पुढे गेले आहेत. विकसनशील अर्थव्यवस्थांपूर्वी मोठा देश याचा फायदा घेण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतील. यामुळे तरुणांना अनेक संधी उपलब्ध होतील. मात्र खरी अडचण जुन्या कर्मचाऱ्यांना भेडसावणार आहे. कारण ते एआय सहजासहजी शिकू शकणार नाहीत.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 40 percent of jobs worldwide cut are at risk due to artificial intelligence imf warns vrd