एज्युटेक स्टार्टअप कंपनी असलेल्या बायजूमधील नोकर कपातीचा सिलसिला काही थांबण्याचे नाव घेत नाहीये. कंपनीने पुन्हा एकदा सुमारे ४०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. यावेळी कामगिरी मूल्यांकना(performance review)च्या नावाखाली कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात आले आहे. दुसरीकडे अंतिम तोडगा काढण्यासाठी कंपनीने या कर्मचाऱ्यांना केवळ २ महिन्यांचा पगार देऊ केला आहे.

बायजूमध्ये ही नोकर कपात मेंटरिंग (teaching staff) आणि उत्पादन तज्ज्ञ विभागात झाली आहे. कंपनीने जुलैमध्ये या कर्मचाऱ्यांच्या कामगिरीचा आढावा घेतला होता. यानंतर १७ ऑगस्ट रोजी कंपनीने या सर्व कर्मचाऱ्यांना राजीनामे सादर करण्यास सांगितले आहे. मनी कंट्रोलच्या बातमीनुसार, बायजूने नोकर कपातीला दुजोरा दिला आहे. विशेष म्हणजे त्यावेळी त्यांनी केवळ १०० लोकांना कामावरून काढले जाईल, असे सांगितले असतानाच मीडिया रिपोर्टनुसार ४०० कर्मचाऱ्यांना १८ ऑगस्ट रोजी कामावरून काढून टाकण्यात आले आहे.

हेही वाचाः कांद्याच्या वाढत्या किमती रोखण्यासाठी मोदी सरकारचा उपाय; निर्यातीवर ४० टक्के शुल्क आकारणार

कंपनीचे म्हणणे आहे की, या कर्मचाऱ्यांना परफॉर्मन्स इम्प्रूव्हमेंट प्लॅन अंतर्गत ठेवण्यात आले होते, परंतु त्या सगळ्यांनी कंपनीच्या अपेक्षेप्रमाणे काम केले नाही. त्यामुळे योग्य ती प्रक्रिया अवलंबली जात आहे. ही नोकर कपात पूर्णपणे कामगिरीवर आधारित आहे, त्याचा खर्च कपातीशी काहीही संबंध नसल्याचंही कंपनीनं स्पष्टीकरण दिलं आहे.

हेही वाचाः टाटांची टायटन आता ‘या’ कंपनीतील २७ टक्के भागभांडवल ४६०० कोटींना विकत घेणार, अधिग्रहण ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा

ऑगस्ट आणि सप्टेंबरचा पगार देण्याची ऑफर

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनीच्या वतीने कर्मचाऱ्यांना स्वतःहून राजीनामा देण्यास सांगण्यात आले आहे. अंतिम तोडगा म्हणून त्यांना ऑगस्ट आणि सप्टेंबरचा पगार देऊ करण्यात आला आहे. राजीनामा देण्यास नकार देणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आले असून, त्यांना १७ ऑगस्टपर्यंतच पगार देण्यात आला आहे. कंपनीच्या एचआर विभागाने पाठवलेल्या ई-मेलमध्ये ९० दिवसांच्या आत अंतिम सेटलमेंट रक्कम निकाली काढण्याचे म्हटले आहे. Byjus ने २०२२-२०२३ मध्ये आतापर्यंत एकूण ५००० हून अधिक कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे. इतकेच नाही तर कर्मचाऱ्यांना अप्रेझल, भविष्य निर्वाह निधी पेमेंट आणि परफॉर्मन्स लिंक्ड पेमेंट देण्यातही विलंब झाला आहे.

Story img Loader