वृत्तसंस्था, नवी दिल्ली

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सार्वजनिक क्षेत्रातील सेंट्रल बँक ऑफ इंडियाला जूनअखेर संपलेल्या तिमाहीत ४१८ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत बँकेच्या नफ्यात ७७.७८ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. थकीत कर्जासाठीची कमी झालेली तरतूद आणि निव्वळ व्याज उत्पन्नातील वाढीमुळे नफ्यात वाढ नोंदविण्यात आली आहे.

बँकेला चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते जून तिमाहीत ३ हजार १७६ कोटी रुपयांचे निव्वळ व्याज उत्पन्न मिळाले आहे. मागील वर्षी याच तिमाहीत ते २ हजार १४२ कोटी रुपये होते. त्यात ४८.२७ टक्क्यांची वाढ झाली आहे. जानेवारी ते मार्च या तिमाहीच्या तुलनेत एप्रिल ते जून तिमाहीत बँकेच्या निव्वळ नफ्यात २६.८ टक्के आणि निव्वळ व्याज उत्पन्नात ९.९ टक्के घट झाली आहे.

आणखी वाचा-‘झी’कडून पुनित गोएंका यांच्या जागी कारभार चालवण्यासाठी अंतरिम समितीची स्थापना

पहिल्या तिमाहीत बँकेच्या निव्वळ व्याज उत्पन्नात ०.६५ टक्क्यांची वाढ होऊन ते ३.५१ टक्क्यांवर पोहोचले आहे. मागील वर्षी पहिल्या तिमाहीत ते २.८८ टक्के होते. आधीच्या तिमाहीच्या तुलनेत मात्र त्यात घट झाली आहे. आधीच्या तिमाहीत ते ४.१ टक्के होते. दरम्यान, मुंबई शेअर बाजारात बँकेचा समभाग सोमवारी ३.४ टक्के वाढ होऊन तो ३१.४ रुपयांवर बंद झाला.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 418 crore profit to central bank print eco news mrj