UAE Lottery Winner : दरवर्षी मोठ्या संख्येने भारतीय दुबई आणि UAE मध्ये जातात, कारण तिथे त्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध होतात. गेल्या काही वर्षांपासून अनेक जण यूएईमध्ये आयोजित लॉटरी जिंकून प्रसिद्धीच्या झोतात येत आहेत. विशेष म्हणजे यंदा एका भारतीयाने यूएई लॉटरीमध्ये सुमारे ४५ कोटी रुपये जिंकले आहेत. UAE मध्ये पाच भारतीयांनी अशी बंपर लॉटरी जिंकल्याने ते चर्चेत आले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

UAE मध्ये ५ भारतीयांनी लॉटरी जिंकली

संयुक्त अरब अमिराती (UAE) च्या वेगवेगळ्या शहरांमध्ये राहणाऱ्या किमान पाच भारतीयांना एकतर लकी ड्रॉ मिळाला किंवा त्यांनी लॉटरी जिंकली आहे. या लोकांपैकी एक नियंत्रण कक्ष ऑपरेटर आहेत, ज्यांनी AED २०,०००,००० ची लॉटरी जिंकली, जी भारतीय चलनात अंदाजे ४५ कोटी रुपये आहे. भारतातील केरळ येथील रहिवासी असलेल्या श्रीजू यांनी UAE च्या ‘महजूज सॅटर्डे मिलियन्स’ लॉटरीमध्ये पहिले पारितोषिक जिंकले आणि त्यासाठी त्यांना सुमारे ४५ कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले.

हेही वाचाः दिल्लीपासून मुंबईपर्यंत एलपीजी सिलिंडर झाले स्वस्त, नवे दर काय?

बुधवारी ड्रॉ जाहीर झाला अन् श्रीजूने ४५ कोटी रुपये जिंकले

बुधवारी १५४ वी सोडत जाहीर करण्यात आली आणि त्यानुसार तेल आणि वायू उद्योगात नियंत्रण कक्ष ऑपरेटर म्हणून काम करणाऱ्या श्रीजू यांनी ‘महजूज सॅटर्डे मिलियन्स’मध्ये सुमारे ४५ कोटी रुपये जिंकले. कंपनीने त्यांच्या mahzooz.ae वेबसाइटवर याबद्दल माहिती दिली, प्रथम पारितोषिक विजेत्या श्रीजूचा फोटो आणि लेख पोस्ट केला.

४५ कोटी जिंकणारा श्रीजू कोण आहे?

केरळची रहिवासी असलेला ३९ वर्षीय श्रीजू गेल्या ११ वर्षांपासून यूएईच्या फुजैराह येथे राहतो आणि काम करतो. सोडतीची बातमी मिळाली तेव्हा तो कामावर होतो. श्रीजूने सांगितले की, मला हे जाणून आश्चर्य वाटले की, त्याने केवळ बक्षीसच नाही तर अव्वल पारितोषिक जिंकले आहे.

हेही वाचाः Mumbai Luxury Flats : समोर समुद्र अन् आजूबाजूला चित्रपट कलाकारांची घरे, मुंबईत ‘या’ ठिकाणी १०० कोटींना विकले गेले दोन फ्लॅट

श्रीजू जिंकलेल्या रकमेचे काय करणार?

श्रीजू म्हणाला, “मी माझ्या कारमध्ये बसणार होतो, जेव्हा मी माझे खाते तपासले. माझा माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. जेव्हा मी लॉटरी जिंकली तेव्हा मला काय करावे हे समजत नव्हते. मी खातरजमा करण्यासाठी महजूजच्या कॉलची वाट पाहत होतो, असंही त्यांनी सांगितलं. श्रीजूला सहा वर्षांची दोन जुळी मुले आहेत. आता तो कोणत्याही आर्थिक दायित्वाशिवाय भारतात घर घेण्याचा विचार करीत आहे.

एका भारतीयाने ११ लाख रुपये जिंकले तर दुसऱ्याने १६ लाख रुपये जिंकले

‘गल्फ न्यूज’नुसार, गेल्या शनिवारी ‘एमिरेट्स ड्रॉ फास्ट ५’मध्ये आणखी एका भारतीयाने राफेल पुरस्कार जिंकला. दुबईत राहणाऱ्या केरळमधील सरथ शिवदासनने सुमारे ११ लाख रुपयांचे बक्षीस जिंकले. याआधी ९ नोव्हेंबरला मुंबईतील ४२ वर्षीय मनोज भावसार यांनी फास्ट ५ राफेलमध्ये सुमारे १६ लाख रुपये जिंकले होते. भावसार गेल्या १६ वर्षांपासून अबुधाबीमध्ये राहत आहेत.

या भारतीयाने दुबईत १ मिलियन अमेरिकन डॉलर जिंकले

८ नोव्हेंबरला दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आयोजित ‘दुबई ड्युटी फ्री मिलेनियम मिलेनियर’ प्रमोशनमध्ये आणखी एक भारतीय अनिल ग्यानचंदानी यांनी १ मिलियन यूएस डॉलर्स जिंकले होते. ८ नोव्हेंबर रोजी एका बातमीमध्ये असे वृत्त आले होते की, ‘महजूज सॅटर्डे मिलियन्स’च्या विजेत्यांमध्ये दोन भारतीयदेखील आहेत, ज्यांनी सुमारे २२ लाख रुपये जिंकले आहेत.

UAE मध्ये भारतीय जास्त लॉटरी आणि ड्रॉ जिंकत आहेत

UAE मध्ये राहणारे भारतीय मोठ्या संख्येने लॉटरीत पैसे गुंतवतात आणि यापैकी बहुतेक लोक मध्यमवर्गीय किंवा निम्न मध्यमवर्गीय आहेत. गेल्या काही वर्षांत अनेक भारतीयांनी लॉटरी आणि ड्रॉद्वारे मोठ्या प्रमाणात पैसे जिंकले आहेत.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 5 indians hit the jackpot in uae and got a bumper amount sreeju indian won rs 45 crores vrd
Show comments