Wipro Subsidiary Companies Merger : देशातील आघाडीची आयटी कंपनी विप्रोने बुधवारी त्याच्या मूळ कंपनी विप्रो लिमिटेडमध्ये पाच उपकंपन्यांचे विलीनीकरण जाहीर केले आहे. बुधवारी त्यांचे शेअर्स सुमारे १ टक्क्यानं घसरले आणि प्रति शेअर ४०७.५० रुपयांवर बंद झाले. मंडळाच्या बैठकीत विलीनीकरणाचा निर्णय घेण्यात आला असून, सप्टेंबर तिमाहीच्या उत्पन्नालाही मान्यता देण्यात आली आहे.

विप्रो एचआर सर्व्हिसेस, विप्रो ओव्हरसीज आयटी सर्व्हिसेस, विप्रो टेक्नॉलॉजी प्रोडक्ट सर्व्हिसेस, विप्रो ट्रेडमार्क होल्डिंग आणि विप्रो व्हीएलएसआय डिझाइन सर्व्हिसेस या मूळ कंपनीमध्ये विलीन केल्या जाणार आहेत, असे बोर्डाच्या बैठकीत सांगण्यात आले. विलीनीकरणास अद्याप वैधानिक आणि नियामक मंजुरीची आवश्यकता असून, ज्यात राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण (NCLT) यांचाही समावेश आहे.

dharavi re devlopment ( संग्रहित छायाचित्र)/ लोकसत्ता
धारावीत लवकरच पाच नमुना सदनिका; पात्र रहिवाशांसह अपात्र, पात्र लाभार्थींना घरांविषयी माहिती
Sharad Pawar
Sharad Pawar : मविआचं सरकार आल्यास मंत्रिमंडळात कोण…
helium leaks discovered on boeings starliner
विश्लेषण :अंतराळयानामध्ये हेलियमचा वापर का केला जातो? बोईंग स्टारलाइनरचा पेच हेलियम गळतीमुळे?
now even Apple is using AI
विश्लेषण : ॲपलचीही आता एआयवर भिस्त… पण या शर्यतीत उशीर झाला का?
2000 crore turnover target for Indkal Technologies from Acer smartphone launch in India
एसर स्मार्टफोनच्या भारतात प्रस्तुतीतून इंडकल टेक्नॉलॉजीजचे २,००० कोटींच्या उलाढालीचे लक्ष्य; महाराष्ट्रात उत्पादन प्रकल्पासाठी चाचपणी
Recognition of prize shares by Reliance Industries
रिलायन्स इंडस्ट्रीजकडून १:१ बक्षीस समभागास मान्यता
Flipkart Big Billion Days Sale 2024
Big Billion Days Sale 2024 : ‘या’ चार स्मार्टफोन्स ब्रॅण्डवर कॅशबॅक, स्मार्ट टीव्ही, फ्रिजवर सूट; कोणत्या वस्तूवर नेमकी किती सूट? जाणून घ्या
Reserve Bank Deputy Governor Swaminathan warns Fintech to avoid debt recovery in wrong way
कर्जवसुली चुकीच्या पद्धतीने नको, रिझर्व्ह बँक डेप्युटी गव्हर्नर स्वामिनाथन यांचा ‘फिनटेक’ना इशारा

‘या’ चार कारणांमुळे विलीनीकरण

ईटीच्या अहवालानुसार, विप्रोने विलीनीकरणाची चार कारणे दिली आहेत. यामध्ये व्यवसाय ऑपरेशन्स मजबूत करणे, ऑपरेशनल ताळमेळ मजबूत करणे, प्रशासकीय अन् व्यवस्थापन, इतर खर्च कमी करणे इत्यादी गोष्टी विलीनीकरणामध्ये समाविष्ट आहेत, सर्व उपकंपन्या पूर्ण मालकीच्या आहेत. या कारणास्तव विलीनीकरणात नवीन समभाग जारी केले जाणार नाहीत. तसेच शेअर्सच्या पॅटर्नमध्ये कोणताही बदल होणार नाही.

हेही वाचाः Money Mantra : फिक्स्ड डिपॉझिटमध्ये पैसे गुंतवून जास्तीत जास्त परतावा कसा मिळवायचा? एफडी लॅडरिंग ठरणार फायदेशीर

किती नफा नोंदवला गेला?

मार्च २०२३ अखेर विप्रो ओव्हरसीज आयटी सर्व्हिसेसची कमाई शून्य होती, विप्रो एचआर सर्व्हिसेसने ६७,७५३ कोटी रुपयांचा महसूल नोंदवला, विप्रो टेक्नॉलॉजी प्रॉडक्ट सर्व्हिसेसने ८५.३ कोटी रुपयांचा महसूल, विप्रो व्हीएलएसआय डिझाइनने २१८ कोटी रुपयांचा महसूल नोंदवला आणि विप्रो ट्रेडमार्कने २९ लाख रुपयांचा महसूल जमा केला आहे. विप्रोने २६६७.३ कोटी रुपयांचा निव्वळ नफाही नोंदवला आहे, जो ०.७० टक्क्यांनी वाढला आहे.

हेही वाचाः दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, मोदी सरकारने महागाई भत्त्यात केली ४ टक्क्यांची वाढ

कर्मचाऱ्यांच्या संख्येत घट

सलग चौथ्या तिमाहीत विप्रोमधील कर्मचाऱ्यांच्या संख्येत घट होत आहे. सप्टेंबरच्या तिमाहीत कर्मचाऱ्यांची संख्या ५०५१ ने कमी झाली आहे. यासह एकूण कर्मचाऱ्यांची संख्या आता २,४४,७०७ झाली आहे. मात्र, कंपनीने सप्टेंबर महिन्यात ५७७ कर्मचाऱ्यांची नियुक्तीही केली होती.