Unclaimed Amount : गेल्या पाच वर्षांत बचत खाते आणि एफडीमध्ये पाच हजार कोटींपेक्षा जास्त दावा न केलेली रक्कम पडून आहे. आता ही रक्कम लवकरात लवकर निकाली काढण्यास सांगितले जात आहे. गेल्या ५ वर्षांत दावा न केलेल्या ठेवींच्या विल्हेवाटीसाठी ठेवीदार शिक्षण आणि जागरूकता (DEA) फंडातून एकूण ५,७२९ कोटी रुपये बँकांमध्ये हस्तांतरित करण्यात आले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दावा न केलेल्या रकमेचा निपटारा करण्यासाठी आणि ही रक्कम तिच्या हक्काच्या मालकाला पाठवण्यासाठी रिझर्व्ह बँकेने एक विशेष उपक्रम सुरू केला आहे. केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत किसनराव कराड यांनी लोकसभेत एका उत्तरात ही माहिती दिली. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने “Depositor Education and Awareness Fund Scheme 2014” याअंतर्गत माहिती दिली आहे, ज्यात हक्क न ठेवलेल्या ठेवींच्या नियमांचा समावेश आहे आणि निधीच्या वापराच्या तपशीलांची रूपरेषा देण्यात आली आहे, असंही कराड म्हणाले. या उपक्रमांतर्गत दावा न केलेल्या रकमेचा निपटारा केला जाणार आहे.

बँकांनी DEA मध्ये किती रक्कम जमा केली?

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी ३१ मार्च २०२३ पर्यंत ठेवीदार शिक्षण आणि जागरूकता निधीमध्ये ३६,१८५ कोटी रुपयांच्या हक्क नसलेल्या ठेवी हस्तांतरित केल्या आहेत. मार्च २०१९ मध्ये ही रक्कम १५,०९० कोटी रुपये होती, तर खासगी बँकांनी ३१ मार्च २०२३ पर्यंत ठेवीदार शिक्षण आणि जागरूकता निधीमध्ये ६,०८७ कोटी रुपये हस्तांतरित केले.

१०० दिवस १०० पेमेंट

PIB नुसार, RBI ने दावा न केलेल्या ठेवींचे प्रमाण कमी करण्यासाठी आणि योग्य दावेदारांना अशा ठेवी परत करण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत. या मोहिमांपैकी एक म्हणजे RBI 100 days 100 payments योजना आहे. ६ जानेवारी २०२३ पासून ते ८ सप्टेंबर २०२३ पर्यंत देशातील प्रत्येक जिल्ह्यात १०० दिवसांत दावा न केलेल्या ठेवी शोधल्यानंतर बँकांना हे पैसे दिले जातील.

दावा न केलेल्या रकमेच्या यादीत तुमचे नाव कसे तपासायचे?

तुम्ही कोणत्याही दावा न केलेल्या रकमेचे हक्कदार असल्यास आणि PNB चे ग्राहक असल्यास तुम्ही http://www.pnbindia.in/inoperactive-accounts.aspx वर भेट देऊन आणि माहिती भरून तपासू शकता.
HDFC ग्राहक लीड्स leads.hdfcbank.com/applications/webforms/apply/HDFC_Inoperative_acc/HDFC_Inoperative_acc.aspx  या लिंकला भेट देऊन तपासू शकतात.
SBI ग्राहक sbi.co.in/web/customer-care/inoperative-accounts या लिंकवर जाऊन तपासू शकतात.

बंद खाते कसे सक्रिय करावे?

तुम्ही बचत खाते किंवा इतर कोणतेही खाते उघडू शकता. त्यासाठी ग्राहकांना जवळच्या शाखेला भेट द्यावी लागेल आणि ते सक्रिय करण्यासाठी फॉर्म सबमिट करावा लागेल. गैर वैयक्तिक खाती असल्यास पत्ता, दस्तऐवज, वैध ओळखपत्र, नोंदणीकृत दस्तऐवज प्रदान करणे बंधनकारक असेल.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 5729 crore unclaimed amount with banks if you dont have money how will you claim vrd