पीटीआय, नवी दिल्ली
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी इन्फोसिसला जूनअखेर संपलेल्या तिमाहीत ५ हजार ९४५ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीला ५ हजार ३६० कोटी रुपयांचा नफा झाला होता. त्यात आता १०.९ टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे.
इन्फोसिसचा महसूल चालू आर्थिक वर्षातील एप्रिल ते जून तिमाहीत ४.२ टक्क्यांनी वाढून ३७ हजार ९३३ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. कंपनीचा कार्यान्वयन नफा तिमाहीत २०.८ टक्के आहे. कंपनी सोडून बाहेर पडणाऱ्या कर्मचाऱ्यांचे प्रमाण १७.३ टक्के आहे. चालू आर्थिक वर्षासाठी कंपनीने महसुलाचे उद्दिष्ट १ ते ३.५ टक्क्यांनी वाढविले आहे. याच वेळी कार्यान्वयन नफ्याचे उद्दिष्ट २० ते २२ टक्के कायम ठेवले आहे.
हेही वाचा >>>एसीसी, अंबुजा सिमेंटचे विलीनीकरण नाही, मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कपूर यांचे स्पष्टीकरण
याबाबत कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक सलील पारेख म्हणाले की, पहिल्या तिमाहीत कंपनीच्या महसुलात ४.२ टक्के वाढ झाली आहे. कंपनीने २.३ अब्ज डॉलरचे करार केले असून, आगामी काळात भक्कम वाढ होणार आहे. आमची कृत्रिम प्रज्ञेची (एआय) क्षमता विस्तारण्यात येत असून, सध्या ८० ग्राहकांच्या प्रकल्पांवर काम सुरू आहे. कृत्रिम प्रज्ञेमुळे ग्राहकांना देण्यात येणाऱ्या सेवेत आमूलाग्र बदल होत असल्याचे नमूद करून, कंपनीची सर्वंकष कृत्रिम प्रज्ञा सेवा ‘टोपाझ’ ग्राहकांच्या पसंतीस उतरत असल्याचे त्यांनी सांगितले.