केंद्र सरकारला सूचीबद्ध सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम कंपन्यांकडून (PSU) लाभांशाच्या (Dividend) रूपात मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. PSUs ने प्रस्तावित केलेल्या अंतिम लाभांशानुसार, सरकारला आर्थिक वर्ष २०२३ साठी सूचीबद्ध PSUs कडून सुमारे ६३,००० कोटी रुपयांच्या निव्वळ लाभांशाची अपेक्षा आहे, जो आतापर्यंतचा सर्वाधिक लाभांश असेल. आर्थिक वर्ष २०२२ मध्ये मिळालेल्या ५०,६०० कोटी रुपयांपेक्षा लाभांशाची रक्कम सुमारे २५ टक्के जास्त असेल. GAIL (इंडिया), हिंदुस्तान कॉपर आणि बाल्मर लॉरी यांसारख्या PSU कंपन्यांनी अंतिम लाभांश जाहीर केलेला नसल्यामुळे आर्थिक वर्ष २०२३ साठी सरकारला मिळणाऱ्या एकूण लाभांश उत्पन्नात आणखी वाढ होऊ शकते. आर्थिक वर्ष २०२३ मध्ये सरकारला मिळणारा लाभांश कोविडपूर्वी आर्थिक वर्ष २०१९ मध्ये मिळालेल्या २९,००० कोटी रुपयांच्या लाभांशाच्या जवळपास दुप्पट आहे. यापूर्वी आर्थिक वर्ष २०१४ मध्ये सरकारला सर्वाधिक ४२,१५० कोटी रुपयांचा लाभांश मिळाला होता. परंतु यावेळी लाभांशाची रक्कम सुमारे ५० टक्के जास्त असू शकते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा