मुंबई: भांडवली बाजारातील पोषक वातावरणाचा फायदा घेत, प्राथमिक बाजारात २०२४ सालात ७२ कंपन्यांनी प्रारंभिक समभाग विक्रीच्या (आयपीओ) माध्यमातून १.२२ लाख कोटींची निधी उभारणी केली. यातून २०२१ मधील १.१८ लाख कोटी रुपयांच्या निधी उभारणीच्या विक्रमाला मागे टाकले आहे. उल्लेखनीय म्हणजे यंदा यापैकी सुमारे ७० टक्के निधी ऑगस्टपासून तीन महिन्यांत जमा झाला आहे. ऑगस्ट महिन्यात एकूण १७,१०९ कोटी रुपयांचा भरणा गुंतवणूकदारांनी ‘आयपीओ’च्या माध्यमातून कंपन्यांमध्ये केला. त्यापाठोपाठ सप्टेंबरमध्ये ११,०५८ कोटी आणि ऑक्टोबरमध्ये सर्वाधिक सुमारे ३८,७०० कोटी रुपयांचा निधी भरणा झाला. यापूर्वी, नोव्हेंबर २०२१ मध्ये सर्वाधिक ३५,६६४ कोटी रुपये ‘आयपीओ’च्या माध्यमातून गुंतवणूकदारांकडून गोळा झाल्याचा विक्रम होता.

नोव्हेंबर महिन्यात आता चार नवीन कंपन्या भांडवली बाजारात नशीब अजमावणार आहेत. यामध्ये स्विगी सर्वाधिक म्हणजे ११,३०० कोटी रुपयांची निधी उभारणी करणार आहे. त्यापाठोपाठ सॅजिलिटी इंडिया, ॲक्मे सोलर होल्डिंग्ज आणि निवा बुपा हेल्थ इन्शुरन्स या कंपन्यांचे आयपीओ बाजारात दाखल होतील. चारही कंपन्यांचे एकंदर १९,३३४ कोटी रुपयांची निधी उभारण्याचे उद्दिष्ट आहे. तर सरलेल्या ऑक्टोबरमध्ये भारतीय भांडवल बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठ्या २७,८७० कोटी रुपयांच्या समभाग विक्रीच्या जेमतेम सफलतेनंतर, ‘ह्युंदाई मोटर इंडिया’च्या समभागाने मात्र गुंतवणूकदारांची निराशा केली. प्रारंभिक भागविक्रीतून प्रत्येकी १,९६० रुपये किमतीला हा समभाग गुंतवणूकदारांनी मिळविला होता. मात्र मोठ्या फायद्यासह सूचिबद्धतेऐवजी समभागाने १.३२ टक्के घसरणीसह सुरुवात करीत निराशा केली. सध्या वितरित किमतीपेक्षा समभाग १० टक्के खाली १,८२२.५५ रुपयांवर व्यवहार करत आहे.

Gold Silver Price Today 20 November 2024 in Marathi| maharashtra election result 2024
Gold Silver Price Today : महाराष्ट्र निवडणुक निकालापूर्वी सोन्याच्या दरात मोठी वाढ; खरेदी पूर्वी जाणून घ्या आजचे दर
wipro bonus share issue
‘विप्रो’कडून बक्षीस समभाग पात्रतेसाठी ३ डिसेंबर रेकॉर्ड तारीख…
stock market updates
बाजाराच्या आकस्मिक मुसंडीमागे, मतदानोत्तर चाचण्यांचा ‘कौल’?
adani group misled indian capital market
अदानींकडून भारताच्या भांडवली बाजाराचीही दिशाभूल?
sebi rules violation loksatta news
‘सेबी’कडून प्रकटन नियमाच्या उल्लंघनाची चौकशी
Ola Electric Plans 500 Job Cuts Amid Mounting Losses
‘ओला इलेक्ट्रिक’कडून ५०० कर्मचाऱ्यांची कपात
us allegations may affect credibility of adani companies
आरोपांमुळे अदानी कंपन्यांवरील विश्वासार्हतेवर परिणाम शक्य : एस ॲण्ड पी
silver outshines gold with over 20 percent returns in 6 months
‘सिल्व्हर ईटीएफ’ना चमक; ऑक्टोबरअखेर मालमत्ता १२,३३१ कोटींवर; परताव्यात ‘गोल्ड ईटीएफ’ला मात

हेही वाचा :GST Collection in October 2024: जीएसटी संकलन ऑक्टोबरमध्ये १.८७ कोटींवर, सहामाही उच्चांकी स्तर

ह्युंदाईनंतर बाजारात पदार्पण केलेल्या गरुड कन्स्ट्रक्शन अँड इंजिनीअरिंगने सूचिबद्धतेच्या वेळी १२ टक्के परतावा दिला. मात्र तो समभागही आता वितरित किमतीपेक्षा खाली घसरला आहे. त्यापाठोपाठ दीपक बिल्डर्स अँड इंजिनीअर्स इंडियाचा समभाग २० टक्के घसरणीसह सूचिबद्ध झाला. वारी एनर्जीचा समभाग देखील ९० टक्के अधिमूल्यासह सूचिबद्ध होणे अपेक्षिले जात होते, मात्र प्रत्यक्षात तो ५९ टक्के अधिमूल्यासह सूचिबद्ध झाला.

हेही वाचा :UPI Transactions: यूपीआय व्यवहारांचा नवीन विक्रम; ऑक्टोबरमध्ये २३.५ लाख कोटी मूल्याचे १६.५८ अब्ज व्यवहार

‘स्विगी’- पूर्व-उत्साहावर विरजण

स्विगीचा आयपीओ ६ ते ८ नोव्हरबर दरम्यान खुला राहणार असून, त्यासाठी कंपनीने ३७१-३९० रुपये किमतपट्टा निश्चित केला आहे. मात्र ‘ग्रे मार्केट’मध्ये समभागाचे अधिमूल्य घसरले असून, ओसरत असलेला पूर्व-उत्साह पाहता समभाग सूचिबद्धतेला अत्यल्प अधिमूल्य मिळणार असल्याचे दर्शवत आहे. एकूणच विश्लेषकांच्या मते, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून (एफआयआय) सतत विक्रीचा दबाव, त्यानंतर निराशाजनक देशांतर्गत तिमाही कमाई यासारख्या अनेक कारणांमुळे बाजारात निराशेचे वातावरण आहे. आगामी आयपीओंसह स्विगी, ॲफकॉन इन्फ्रास्ट्रक्चर, ॲक्मे सोलर आणि सॅजिलिटी इंडिया यांच्या समभागांना बाजारातील मंदीची झळ जाणवेल, अशी शक्यता मेहता इक्विटीजचे विश्लेषक प्रशांत तपासे यांनी व्यक्त केली.