मुंबई : विद्यमान कॅलेंडर वर्ष २०२४ मध्ये आतापर्यंत फक्त एकदाच सार्वभौम सुवर्ण रोखे योजनेच्या माध्यमातून गुतंवणूकदारांना गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणुकीची संधी प्राप्त झाली. गेल्या नऊ महिन्यांच्या कालावधीत बाजारात एकाही नवीन सुवर्ण रोखे योजनेचे पदार्पण झालेले नाही. तथापि, चालू वर्षात म्युच्युअल फंडांच्या ‘गोल्ड ईटीएफ’मध्ये ७,३६७ कोटी रुपयांची गुंतवणूक नव्याने आली आहे. २०२३ या संपूर्ण वर्षातील २,९१९ कोटी रुपयांच्या तुलनेत यंदा त्यातील आवक १५२ टक्क्यांनी वाढली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> जिओ फायनान्शियल-अलायन्झची विमा क्षेत्रात भागीदारी

केंद्र सरकारने विद्यमान वर्षातील ऑगस्ट महिन्यात पाच वर्षे पूर्ण केलेल्या सार्वभौम सुवर्ण रोख्यांची मुदतपूर्व विमोचन जाहीर करत येत्या काळात नवीन सुवर्ण रोखे आणले जाणार नसल्याचे जाहीर केले. त्याआधीच्या कॅलेंडर वर्ष २०२३ मध्ये सादर करण्यात आलेल्या चार टप्प्यांतील रोख्यांच्या तुलनेत फक्त एकदाच सुवर्ण रोखे विक्रीसाठी उपलब्ध केले. ज्यामुळे कॅलेंडर वर्ष २०२४ मध्ये आतापर्यंत ७,३६७ कोटी रुपयांचा ओघ गोल्ड ईटीएफकडे वळला आहे.

हेही वाचा >>> ‘एआय’ नवोपक्रमांसाठी रिलायन्स, एनव्हीडिया भागीदारी

सध्या सोन्याच्या दराने ८०,००० रुपये प्रति दहा ग्रॅम अशी सर्वोच्च उच्चांकी पातळी गाठली आहे. परिणामी, केंद्र सरकारकडून सध्या नवीन सुवर्ण रोखे बाजारात विक्रीसाठी खुले होण्याची शक्यता दिसून येत नाही. जागतिक भू-राजकीय ताण आणि जगभरात मध्यवर्ती बँकांनी केलेल्या आक्रमक सोन्याच्या खरेदीमुळे सोन्याची मागणी वाढली असून, या मौल्यवान धातूच्या शाश्वत मूल्यामुळे गुंतवणूकदारांचाही त्याकडे ओढा वाढला आहे. अमेरिकी मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हच्या व्याजदर कपातीमुळे मौल्यवान धातूच्या मागणीत आणखी वाढ झाली आहे.

चालू वर्षात गोल्ड ईटीएफ गुंतवणुकीने सरासरी २१.६३ टक्के परतावा दिला आहे. इन्व्हेस्को इंडिया ईटीएफने या कालावधीत हा सर्वाधिक परतावा, तर ॲक्सिस गोल्ड ईटीएफने सर्वात कमी २१.३० टक्के परतावा दिला. आर्थिक नियोजनात संतुलित वैविध्य सुनिश्चित करण्यासाठी गुंतवणूकदाराच्या एकूण पोर्टफोलिओत किमान ८ ते १० टक्के सोन्याच्या गुंतवणुकीचा समावेश असावा, असे सुचविले जाते.