2000 Note Withdrawal : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) १९ मे रोजी २,००० रुपयांच्या नोटा बाजारातून मागे घेण्याची घोषणा केली. २००० रुपयांच्या नोटा वितरणातून बाद करण्याचा निर्णय घेतल्यापासून ३० जूनपर्यंत एकूण ३.६२ लाख कोटी रुपयांपैकी २.७२ लाख कोटी रुपये म्हणजेच ७६ टक्के नोटा बँकांमध्ये परत आल्या आहेत.

३० सप्टेंबरपर्यंत नोटा बदलण्याची / जमा करण्याची संधी

१९ मे रोजी मध्यवर्ती बँकेने अचानक २००० रुपयांच्या नोटा वितरणातून बाद करण्याचा निर्णय घेतला. लोकांना ३० सप्टेंबरपर्यंत त्यांच्या बँक खात्यात २००० रुपयांच्या नोटा जमा करण्यास किंवा इतर मूल्यांच्या नोटा बदलण्यास सांगितले आहे. मूल्याच्या बाबतीत मार्च २०२३ मध्ये एकूण ३.६२ लाख कोटी रुपयांच्या नोटा २००० रुपयांच्या होत्या. २००० रुपयांच्या नोटा वितरणातून बाद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर ३० जूनपर्यंत एकूण ३.६२ लाख कोटी रुपयांपैकी २.७२ लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कम बँकांकडे परत आली आहे. ३० जूनपर्यंत बाजारात २००० रुपयांच्या नोटांचे चलन ०.८४ लाख कोटी रुपये आहे. म्हणजेच १९ मे २०२३ पासून आतापर्यंत २००० रुपयांच्या ७६ टक्के नोटा बँकांकडे परत आल्या आहेत.

PMC Bank Scam Hearing on petitions of aggrieved account holders on December 12 mumbai news
पीएमसी बँक घोटाळा; पीडित खातेधारकांच्या याचिकांवर १२ डिसेंबरला सुनावणी
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
hearing in bombay high court after two years in pmc bank scam
पीएमसी बँक घोटाळ्यात दोन वर्षांनंतर आज सुनावणी
loksatta editorial no interest rate cut by rbi retail inflation surges in october
अग्रलेख : म्हाताऱ्या शब्दांचा आरसा…
indian rupee falls to all time low against us dollar
अग्रलेख : काका… मला वाचवा!
Use UPI without Bank account NPCI launches new feature UPI Circle for family members and friends
आता बँक खाते नसलेला व्यक्ती करू शकतो UPIचा वापर; NPCIने कुटुंबातील सदस्यांसाठी सुरू केलं UPI Circle, जाणून घ्या नव्या फीचरबद्दल…
public banks profit increase by 26 percent in first half fy 25
सरकारी बँकांच्या नफ्यात सहामाहीत २६ टक्के वाढ
life insurance fraud pune marathi news
पुणे: आयुर्विमा पॉलिसीच्या नावाखाली तरुणीची १३ लाखांची फसवणूक

हेही वाचाः मोदी सरकार आता ‘या’ सरकारी बँकेतील ४९ टक्के भागीदारी विकणार; क्रेडिट कार्ड व्यवसायावर परिणाम होणार

८७ टक्के नोटा बँकांमध्ये जमा झाल्यात

आरबीआयच्या आकडेवारीनुसार, परत आलेल्या २००० रुपयांच्या ८७ टक्के नोटा जमा करण्यात आल्यात, तर १३ टक्के नोटा बदलून देण्यात आल्यात. लोकांना ३० सप्टेंबरपर्यंत २००० रुपयांच्या नोटा बदलून किंवा जमा करण्याची संधी आहे.

हेही वाचाः केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी डबल धमाका, डीएबरोबर ‘हा’ भत्ताही वाढण्याची शक्यता

जनहित याचिका फेटाळली

२००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) निर्णयाला आव्हान देणारी जनहित याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. सरन्यायाधीश सतीश चंद्र शर्मा आणि न्यायमूर्ती सुब्रमण्यम प्रसाद यांनी ही याचिका फेटाळून लावली. यापूर्वी या याचिकेवरील निकाल ३० मे रोजी राखून ठेवण्यात आला होता.