मुंबई : सुविधा व्यवस्थापन आणि सुरक्षा रक्षक सेवा प्रदाता कंपनी क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस लिमिटेडने येत्या आठवड्यात भांडवली बाजारात खुल्या प्रारंभिक समभाग विक्रीद्वारे ३०० कोटी रुपये उभारत असल्याचे सोमवारी पत्रकार परिषदेत जाहीर केले. आमदार आणि भाजप प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड हे या कंपनीचे संस्थापक आणि सर्वेसर्वा असून, उल्लेखनीय म्हणजे ३० सप्टेंबर २०२३ अखेर उपलब्ध तपशिलाप्रमाणे कंपनीच्या महसुलात तब्बल ७६.२७ टक्के हिस्सा हा सरकारी कंत्राटांचा आहे.

लाड यांच्या या कंपनीने २००० मध्ये खासगी सुरक्षा कर्मचारी सेवेच्या क्षेत्रात काम सुरू केले आणि २००५ सालापासून सुविधा व्यवस्थापन विभागात तिने प्रवेश केला. कंपनीकडे मुंबईतील मंत्रालयांसह, बृहन्मुंबई महानगर पालिका मुख्यालय आणि अनेक सरकारी विभागांमध्ये स्वच्छता, बागकाम, इलेक्ट्रिकल, प्लम्बिंग आणि इतर सेवांचे कंत्राट, तसेच सरकारी शाळा व कार्यालयांमध्ये सुरक्षा रक्षक पुरवण्याचे कामे आहेत. क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेसने ३० सप्टेंबर २०२३ रोजी समाप्त सहा महिन्यांत सरकारी कामांसाठी निविदा दाखल करून यशस्वी बोलीसह एकही नवीन कंत्राट मिळविले नसले, तरी मागील काही वर्षांत सरकारी कंत्राटे आणि त्यायोगे कंपनीचा महसूल उत्तरोत्तर वाढत आला आहे. मार्च २०२१ अखेर क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेसच्या सरकारी कंत्राटाचे प्रमाण ४६ होते आणि त्यायोगे वार्षिक महसूल ३२७.१ कोटी रुपये होता, तर ३० सप्टेंबर २०२३ अखेर सरकारी कंत्राटांची संख्या ५२ वर गेली, तर अर्धवार्षिक महसूल ३४४.४ कोटी रुपये असा होता. सरकारी प्रशासन, शिक्षणसंस्था, रुग्णालये व वैद्यकीय महाविद्यालये या व्यवसाय क्षेत्रात क्रिस्टलच्या ग्राहकांमध्ये सरकारी कंत्राटांची हिस्सेदारी अनुक्रमे १०० टक्के, ९५.७२ टक्के आणि ९३.८० टक्के अशी आहे.

pune Penal action against two senior officers for facilitating bogus payments at Jijamata Hospital
पिंपरी : मानधनाची २१ लाखांची बोगस बिले लाटली; दाेन वैद्यकीय अधिकाऱ्यांवर पाचशे रुपये…
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
ipo allotment loksatta news
‘आयपीओ’ मिळण्याची शक्यता कशी वाढवावी? कटऑफ किंमत, एकापेक्षा अधिक डिमॅट खाती, कोटा याबाबत निर्णय कसा करावा?
43 ministers maharashtra
विश्लेषण : महाराष्ट्रात ४३ मंत्रीच? मंत्रिमंडळात मंत्र्यांची संख्या किती असते? या संख्येवर बंधने का असतात?
public sector banks npa marathi news
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे ‘एनपीए’ ३.१६ लाख कोटींवर
t Plus zero transaction system
आघाडीच्या ५०० कंपन्यांमध्ये ३१ डिसेंबरपासून ‘टी प्लस शून्य’ व्यवहार प्रणाली
sunk deposits loksatta news
विश्लेषण : बुडालेल्या ठेवी परत मिळू शकतात? शासनाचे नवे परिपत्रक काय?
Mumbai ed investigation reveals Mehmood Bhagad is mastermind behind Rs 100 crore Malegaon scam
मालेगाव आर्थिक गैरव्यवहार प्रकरणः मुख्य सूत्रधाराची ओळख पटली, दुबईतील पाच कंपन्यांच्या खात्यावरही ४ कोटी रुपये जमा

हेही वाचा >>> स्मॉल, मिड कॅप फंडांवर निर्गुंतवणुकीचा ताण नसल्याचा उद्योग क्षेत्राचा निर्वाळा

सरकारच कंपनीचा मुख्य ग्राहक आहे आणि त्यावरच सर्वाधिक मदार असणे हे कंपनीच्या आर्थिक कामगिरीसाठी जोखमीचे ठरत नाही काय? या प्रश्नाला उत्तर देताना, कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दिघे म्हणाले, ‘सरकारी आस्थापने आणि सहयोगी संस्थांशी चांगले संबंध राखण्याच्या कंपनीच्या क्षमतेवर तिचे भविष्यातील व्यावसायिक यश मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. तरी ते असणे अनेकांगाने फायद्याचेही ठरत आहे, हेही लक्षात घ्यावयास हवे. सरकारी कंत्राटांतून महसूल वाढीचा दर १६ टक्के, तर बिगर-सरकारी खासगी उद्योगांच्या व्यवसायातून महसूल वाढ १० टक्के दराने सुरू आहे,’ अशी पुस्तीही त्यांनी जोडली. कंपनीची एकंदर ग्राहकसंख्या ३०० पेक्षा अधिक असून, बँका व वित्तीय संस्था, किराणा क्षेत्रात या बिगर-सरकारी क्षेत्राचा यात मोठा वाटा आहे, असे प्रसाद लाड यांनीही नमूद केले. एचडीएफसी बँकेच्या देशव्यापी शाखांच्या जाळ्यात आणि डी-मार्टच्या देशभरातील दालनांमध्ये क्रिस्टलच्या सेवा सुरू असल्याचे त्यांनी उदाहरणादाखल सांगितले. प्रस्तावित ‘आयपीओ’साठी क्रिस्टलच्या समभागांसाठी गुंतवणूकदारांना प्रत्येकी ६८० रुपये ते ७१५ रुपये या किमतीदरम्यान बोली लावता येईल. ही समभाग विक्री गुरुवार १४ मार्चपासून ते १८ मार्चपर्यंत सुरू राहिल. विक्रीसाठी खुल्या होणाऱ्या २४.४७ लाख समभागांपैकी, प्रवर्तक प्रसाद लाड आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या (क्रिस्टल फॅमिली होल्डिंग्ज) मालकीचे १७.५ लाख समभाग विकले जाणार आहेत. लाड यांच्या पत्नी नीता या कंपनीच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालिका आहे. कंपनीचे प्रवर्तक कुटुंबीय त्यांच्या मालकीचे समभाग विकून १२५ कोटी रुपये मिळवणार आहेत. तर या व्यतिरिक्त उभारल्या जाणाऱ्या १७५ कोटी रुपयांपैकी, १०० कोटी रुपये खेळत्या भांडवलासाठी, १० कोटी रुपये कर्जफेडीसाठी आणि १० कोटी रुपये नवीन यंत्रसामग्रीच्या खरेदीसाठी वापरले जाणार आहेत. समभाग विक्रीपश्चात प्रवर्तक कुटुंबीयांची कंपनीतील भागभांडवली हिस्सेदारी सध्याच्या १०० टक्क्यांवरून, ७० टक्क्यांपर्यंत सौम्य होणार आहे.

Story img Loader