पीटीआय, नवी दिल्ली

किराणा क्षेत्रातील रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेडमध्ये ‘कतार इन्व्हेस्टमेंट अथॉरिटी’कडून ८,२७८ कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे, अशी माहिती रिलायन्स इंडस्ट्रीजने बुधवारी दिली.

Mumbaikars contribution in mutual funds
म्युच्युअल फंडात मुंबईचाच सिंहाचा वाटा; १७.८३ लाख कोटींचे योगदान; मुंबईसह महाराष्ट्राच्या तुलनेत अन्य राज्यांत वाढती दरी
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Reliance-Disney merger completed, Reliance-Disney,
रिलायन्स-डिस्ने यांचे ७०,३५२ कोटींचे महाविलीनीकरण पूर्ण
इक्विटी म्युच्युअल फंडात ऑक्टोबरमध्ये विक्रमी ४१,८८७ कोटींचा ओघ
oil india limited portfolio
माझा पोर्टफोलियो : पोर्टफोलिओला महारत्नाची जोड
mega block on central and western line for repair of railway tracks and signals system
Mumbai Local Train Update: रविवारी मध्य, पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक
Eat Right Station certification is awarded by FSSAI
रेल्वे स्थानकावर आता बिनधास्त खा! पुणे, कोल्हापूर, साताऱ्यासह १० स्थानके ‘ईट राइट स्टेशन’

रिलायन्स रिटेलमार्फत रिलायन्स फ्रेश, ट्रेंड्स, जिओमार्ट, डिजिटल आदी जवळपास १२,००० विक्री दालने देशातील विविध शहरांमध्ये चालवली जातात. ‘कतार इन्व्हेस्टमेंट अथॉरिटी’कडून करण्यात येणाऱ्या गुंतवणुकीच्या बदल्यात त्यांना रिलायन्स रिटेलमधील ०.९९ टक्के भागभांडवल देण्यात येणार आहे. ‘कतार इन्व्हेस्टमेंट अथॉरिटी’च्या जागतिक अनुभवाचा आणि मूल्य निर्मितीच्या मजबूत अनुभवाचा लाभ रिलायन्स रिटेल व्हेंचर्सला होणार असून त्यामुळे कंपनीचा अधिक विस्तार होण्यास मदत होईल, असे रिलायन्स रिटेलच्या संचालिका ईशा अंबानी पिरामल म्हणाल्या.

आणखी वाचा-‘चंद्रयान-३’: अंतराळ आणि संरक्षण क्षेत्रातील कंपन्यांचे भावही गगनाला!

करोना-टाळेबंदी काळादरम्यान म्हणजेच २०२० सालात, रिलायन्स रिटेलने १०.०९ टक्के हिस्सेदारी विकून जागतिक गुंतवणूकदारांकडून ४७,२६५ कोटी रुपयांचा (सुमारे ६.४ अब्ज अमेरिकी डॉलर) निधी उभारला होता. परिणामी सध्या कंपनीचे मूल्यांकन ४.२ लाख कोटी रुपयांच्या घरात गेले आहे. कंपनीने त्यावेळी सिल्व्हर लेक, केकेआर, मुबादला, आबू धाबी इन्व्हेस्टमेंट अथॉरिटी, जीआयसी, टीपीजी, जनरल अटलांटिक आणि सौदी अरेबियाच्या पब्लिक इन्व्हेस्टमेंट फंडाकडून गुंतवणूक प्राप्त केली होती. त्यावेळी रिलायन्स जिओनेदेखील फेसबुक, गूगल, मायक्रोसॉफ्टच्या माध्यमातून परदेशी गुंतवणूक खेचून आणली होती.