बाजारातून ५०० रुपयांच्या नोटा गायब झाल्याच्या वृत्ताचे आरबीआयने खंडन केले असून, केंद्रीय बँकेने याबाबत स्पष्टीकरण जारी केले आहे. अर्थव्यवस्थेतून मोठ्या प्रमाणात ५०० रुपयांच्या नोटा गायब झाल्या आहेत. त्यांची किंमत ८८,०३२.५० कोटी रुपये आहे, असा एका आरटीआय अहवालाचा हवाला देत मीडिया रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला होता. परंतु आरटीआयमधून मिळालेल्या माहितीचा चुकीचा अर्थ लावल्यामुळे असे झाल्याचे केंद्रीय बँकेने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. देशातील तीन प्रिंटिंग प्रेसमधून ५०० रुपयांच्या नोटांबाबत आरटीआय अंतर्गत दिलेल्या माहितीचा चुकीचा अर्थ लावला गेला आहे. रिझर्व्ह बँकेला प्रिंटिंग प्रेसमधून दिलेली प्रत्येक नोट मोजली जाते, असे केंद्रीय बँकेने म्हटले आहे. यासाठी मजबूत यंत्रणा आहे. आरबीआयने लोकांना अशा प्रकरणांत केवळ मध्यवर्ती बँकेने दिलेल्या माहितीवर विश्वास ठेवण्याचा सल्ला दिला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा