लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
मुंबई : मानवरहित विमान प्रणाली अर्थात ड्रोनची निर्माता कंपनी असलेल्या ‘आयडिया फोर्ज टेक्नॉलॉजी’च्या समभागाने पदार्पणात गुंतवणूकदारांना ९४ टक्के परतावा दिला आहे. विद्यमान कॅलेंडर वर्षात भांडवली बाजारात सूचिबद्ध झालेल्या कंपन्यांमध्ये सर्वाधिक आहे.
जून महिन्यात प्रत्येकी ६७२ रुपयांनी सार्वजनिक प्रारंभिक विक्रीद्वारे गुंतवणूकदारांनी मिळविलेल्या कंपनीच्या समभागाची शुक्रवारी मुंबई शेअर बाजारात नोंदणी होताच सकाळच्या व्यवहारात ९४ टक्के अधिमूल्यासह त्याने १,३०५.१० रुपयांच्या पातळीवरून व्यवहाराला सुरुवात केली. तर राष्ट्रीय शेअर बाजारात १,३०० रुपयांच्या पातळीवरून व्यवहाराला सुरुवात झाली. नंतरच्या व्यवहारात मुंबई शेअर बाजारात तो १३४३.९५ रुपयांपर्यंत झेपावला, तर त्याचा दिवसाचा तळही १,२६० रुपयांनजीक होता. दिवसअखेर समभाग वितरित किमतीच्या तब्बल ९२.९३ टक्क्यांनी म्हणजेच ६२३.५० रुपयांनी वधारून १२९५.५० रुपयांवर स्थिरावला.
कंपनीने प्रारंभिक समभाग विक्रीतून ६०७ कोटी रुपयांचा निधी उभारला होता. त्यासाठी प्रत्येकी २७० ते २८५ किंमतपट्टा निश्चित केला होता.देशांतर्गत ड्रोनला वाढती मागणी, संरक्षण क्षेत्रातील वाढता वापर आणि कंपनीच्या प्रारंभिक समभाग विक्रीला मिळालेला प्रतिसाद पाहता समभाग चांगल्या पातळीवर सूचिबद्ध होण्याचे कयास बाजार तज्ज्ञांची व्यक्त केले होते. प्रारंभिक समभाग विक्रीसाठी १०६.६ पट अधिक प्रतिसाद प्राप्त झाला होता. त्यामध्ये पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांनी १२५.८१ पट आणि किरकोळ गुंतवणूकदारांनी ८५.२० पट अधिक मागणी नोंदवली होती. कंपनीने समभाग विक्रीसाठी ६३८-६७२ रुपये प्रतिसमभाग किंमतपट्टा निश्चित केला होता.