स्टेट बँक ऑफ इंडियाने बँकिंग सेवांचा लाभ घेण्याची सुलभता आणि सुविधा वाढवण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून, आपल्या आर्थिक समावेशी (FI) ग्राहकांसाठी ‘मोबाइल हँडहेल्ड डिव्हाइस’ सादर करण्याची घोषणा केली आहे. एसबीआयचे अध्यक्ष दिनेश खारा यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलेल्या या नावीन्यपूर्ण उपक्रमाचा उद्देश आर्थिक समावेशन सशक्त करणे आणि आवश्यक बँकिंग सेवा जनतेपर्यंत पोहोचवणे हा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विशेष म्हणजे हे हातात धरण्याजोगे आणि कोठेही नेता येण्याजोगे उपकरण थेट ग्राहकांच्या दारापर्यंत बँकिंग सेवा आणून बँकिंग सुलभतेत क्रांती घडवून आणण्यासाठी सज्ज आहे. हे उपकरण ग्राहक सेवा बिंदू (CSP) वर काम करणाऱ्या एजंट्सना अधिक लवचिकता प्रदान करते, ज्यामुळे ते ग्राहक जिथे आहेत तिथपर्यंत पोहोचू शकतात. या उपक्रमाचा विशेषत्वाने आरोग्य समस्या असणारे ग्राहक, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगजन यांसारख्या ग्राहक सेवा बिंदू केंद्रात पोहोचवण्यासाठी आव्हानांचा सामना करणाऱ्या ग्राहकांना फायदा होणार आहे.

हेही वाचाः SBI Chairman: सरकारने स्टेट बँकेचे चेअरमन दिनेश खारा यांचा कार्यकाळ वाढवला, ते SBI चे चेअरमन किती काळ राहणार?

हे उपकरण त्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात रोख पैसे काढणे, रोख ठेव, निधी हस्तांतरण, जमा रक्कम चौकशी आणि मिनी स्टेटमेंट या सारख्या पाच अति महत्त्वाच्या बँकिंग सेवा प्रदान करणार आहे. या सेवा म्हणजे एसबीआयच्या ग्राहक सेवा बिंदू केंद्रातून केल्या जाणाऱ्या एकूण व्यवहारांपैकी ७५ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. याव्यतिरिक्त बँक लवकरच या उपकरणाद्वारे सामाजिक सुरक्षा योजनांतर्गत नावनोंदणी, खाते उघडणे, पैसे पाठवणे आणि कार्ड-आधारित सेवा यांसारख्या सेवांचा समावेश करून आपल्या सेवांचा विस्तार करण्याची योजना आखत आहे.

हेही वाचाः व्हेज थाळी १७ टक्क्यांनी झाली स्वस्त, CRISIL ने सांगितले ‘हे’ कारण

एसबीआयचे अध्यक्ष दिनेश खारा यांनी या उपक्रमाबाबत आपला दृष्टिकोन व्यक्त केला. “समाजातील सर्व घटकांसाठी, विशेषतः बँक खाते नसलेल्यांना आर्थिक समावेशाच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी बँकिंग सुविधा उपलब्ध करून देणे हे आमचे उद्दिष्ट आहे. या नव्या उपकरणामुळे ग्राहकांना ते जिथे असतील तेथून व्‍यवहार करण्‍याचा विनाखंड अनुभव मिळेल. हा तंत्रज्ञान आधारित उपक्रम आमच्या ग्राहकांना सोयीस्कर आणि घरातून बँकिंग सेवा प्रदान करून डिजिटायझेशनद्वारे आर्थिक समावेशन आणि सामाजिक कल्याण साधण्यासाठी एसबीआयची वचनबद्धता अधोरेखित करतो.”

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A new facility for crores of sbi customers will now get banking services at home vrd
Show comments