देशातील प्रत्येक व्यक्तीच्या महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक असलेल्या आधार कार्डशी संबंधित मोठी बातमी समोर येत आहे. खरं तर आधार कार्डमध्ये नाव, पत्ता, मोबाईल नंबर इत्यादी काही ना काही चुका आहेत, असे असंख्य लोक आहेत. विशेष म्हणजे अद्ययावत करण्यासाठी भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) ग्राहकाकडून ५० रुपये शुल्क आकारते, जे काही काळासाठी विनामूल्य आहे.
आजपर्यंत ही सेवा मोफत आहे
जर तुम्हाला तुमच्या आधार कार्डमध्ये नाव, पत्ता, जन्मतारीख, लिंग, मोबाइल नंबर, ई-मेल आयडी यांसारखे कोणतेही बदल अपडेट करायचे असतील, तर तुम्ही ते १४ डिसेंबरपर्यंत विनामूल्य करू शकाल. यापूर्वी अंतिम तारीख १४ सप्टेंबर होती. युजर्सना त्यांचे तपशील नियमितपणे अपडेट करत राहण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी ही सूट देण्यात आली आहे. हा उपक्रम विशेषत: अशा लोकांसाठी आहे, ज्यांना १० वर्षांपूर्वी आधार कार्ड मिळाले आणि आजपर्यंत ते कधीही अपडेट केलेले नाही.
हेही वाचाः गुंतवणूकदारांचा शेअर बाजारावरील विश्वास वाढला, ऑगस्ट महिन्यात ३१ लाख नवीन डिमॅट खाती उघडली
पुन्हा मुदत वाढवली
खरं तर आधार अपडेट करण्याची ही मोफत सेवा आधी केवळ १४ जूनपर्यंत उपलब्ध होती, नंतर ती ३ महिन्यांसाठी १४ सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली होती आणि आता पुन्हा एकदा १४ डिसेंबरपर्यंत मुदत वाढवण्यात आली आहे. ही मोफत सेवा फक्त ऑनलाइन अपडेटसाठी उपलब्ध आहे. जर तुम्ही ऑफलाइन केंद्रांवर गेलात तर तुम्हाला आवश्यक पेमेंट करावे लागेल.
ऑनलाइन अपडेट कसे करायचे?
- सर्वप्रथम तुम्हाला MyAadhaar पोर्टल किंवा अधिकृत आधार वेबसाइट (myaadhaar.uidai.gov.in) ला भेट द्यावी लागेल.
- त्यानंतर “लॉग इन” वर क्लिक करा आणि तुमचा आधार कार्ड क्रमांक आणि कॅप्चा भरा आणि “ओटीपी जनरेट करा” वर क्लिक करा.
- त्यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर पाठवलेला OTP टाका.
- पुढील टप्प्यात आता “Address Update” निवडा आणि नंतर “Aadhaar Online Update” निवडा.
- नंतर तुम्हाला अपडेट करायचा असलेल्या श्रेणीवर टॅप करा: नाव, जन्मतारीख, लिंग, पत्ता इ.
- आता पुरावा म्हणून आवश्यक कागदपत्रे अपलोड करण्यासाठी पुढे जा
- एकदा तुम्ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर १४ अंकी अपडेट अॅप्लिकेशन नंबर (URN) निर्माण केला जाईल.
- मिळालेल्या URN च्या मदतीने तुम्ही तुमच्या आधार कार्ड अपडेट स्टेटसचा मागोवा घेऊ शकता.