भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) ने आधार कार्डधारकांसाठी एक महत्त्वपूर्ण सूचना जारी केली आहे. नोंदणीकृत मोबाइल नंबर अचूक आणि अद्ययावत राखण्याच्या महत्त्वावर या सूचनेत भर देण्यात आला आहे. आजच्या डिजिटल युगात शासकीय आणि बिगर शासकीय सेवा, अनुदान, निवृत्तीवेतन, शिष्यवृत्ती यांसारख्या इतर अनेक सुविधा मिळवण्यासाठी आधार नंबर हा एक महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. त्यामुळे आधारकार्डाशी संबंधित माहितीची अचूकता सुनिश्चित करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आधारद्वारे मिळणाऱ्या ऑनलाइन सेवांचे जग खुले करण्यासाठी नोंदणीकृत मोबाइल नंबर गुरूकिल्ली म्हणून काम करतो. शासकीय आणि बिगर शासकीय सेवा, अनुदानाचा लाभ, निवृत्तीवेतन, शिष्यवृत्ती, सामाजिक लाभ, बँकिंग, विमा, कर आकारणी, शिक्षण, रोजगार आणि आरोग्य सेवा यासह इतर सेवांच्या विस्तृत श्रेणीची उपलब्धता सक्षम करण्यासाठी हे आवश्यक आहे. या सेवांचा लाभ घेताना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी वैध आणि अद्ययावत मोबाइल नंबर आवश्यक आहे.

हेही वाचाः तरुणांसाठी खुशखबर! ६ महिन्यांत बँकिंग क्षेत्रात ५० हजार नोकऱ्या उपलब्ध होणार

आधारसाठी नोंदणी करताना वापरकर्त्याचा मोबाईल नंबर आधीच नोंदणीकृत केलेला नसेल, तर त्याची नोंदणी करण्यासाठी कायमस्वरूपी नावनोंदणी केंद्राला भेट देणे गरजेचे आहे. एकदा नोंदणीकृत झाल्यानंतर, मोबाइल नंबर अनेक महत्त्वाच्या सेवांमधील दुवा म्हणून काम करत करतो. विवाह, स्थलांतर किंवा वैयक्तिक तपशिलांमध्ये बदल यांसारखे बदल आधार माहितीमध्ये अद्ययावत करणे आवश्यक आहे. या बदलांमध्ये नाव, पत्ता, मोबाइल नंबर, ईमेल पत्ता आणि इतर काही बदल समाविष्ट असू शकतात. सेवा वितरणातील व्यत्यय टाळण्यासाठी आणि आधार प्रोफाइलची अखंडता राखण्यासाठी अचूक लोकसंख्याशास्त्रीय माहितीची खात्री करणे महत्त्वाचे आहे.

हेही वाचाः तरुणांसाठी खुशखबर! ६ महिन्यांत बँकिंग क्षेत्रात ५० हजार नोकऱ्या उपलब्ध होणार

आधार कार्डावरील लोकसंख्याशास्त्रीय माहिती अद्ययावत करणे आवश्यक असून, अधिकृत UIDAI पोर्टलद्वारे ही प्रक्रिया सहजपणे करता येते. नावनोंदणी प्रक्रियेतील चुका दुरुस्त करणे किंवा इतर आवश्यक बदल करणे असो, UIDAI पोर्टल ही अद्ययावत सुलभ करण्यासाठी वापरकर्ता अनुकूल इंटरफेस प्रदान करते.विस्तृत श्रेणीमधील सेवांची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी सर्व नागरिकांनी आवश्यक असेल, तेव्हा त्यांच्या लोकसंख्याशास्त्रीय माहितीची पडताळणी आणि माहिती अद्ययावत करावी, असे आव्हान यूआयडीएआयच्या वतीने करण्यात येत आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aadhaar registered mobile number is now required to be updated for easy access to online services vrd