पीटीआय, नवी दिल्ली

बांधकाम व्यावसायिक अभिषेक लोढा आणि त्यांच्या कुटुंबीयांनी शुक्रवारी त्यांच्या मॅक्रोटेक डेव्हलपर्स लिमिटेड या कंपनीतील १८.०९ टक्के हिस्सा हा धर्मादाय कार्यासाठी दिला. समूहातील ‘लोढा फिलान्थ्रॉपी फाऊंडेशन’ला (एलपीएफ) हा २१ हजार कोटी रुपयांचा हिस्सा हस्तांतरित करण्यात आला आहे.

US Presidential Election Results 2024 Live Updates in Marathi| Donald Trump vs Kamala Harris Live
US Election Results 2024 Updates: निवडून येताच डोनाल्ड ट्रम्प यांचं टीकाकारांना उत्तर; म्हणाले, “मी युद्ध घडवून आणणार नाही, तर…”
Todays Horoscope 9 November In Marathi
९ नोव्हेंबर पंचांग: कष्टाचे फळ, कुटुंबात गोडवा ते…
Maharashtra Assembly Election 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर काँग्रेसमध्ये दोन गट? शाहू महाराज – सतेज पाटील यांच्यातील संबंधात कटुता?
Supriya Sule Sunil Tingre
Supriya Sule : “…तर तुम्हाला कोर्टात खेचेन, सुनील टिंगरेंकडून शरद पवारांना नोटीस”, सुप्रिया सुळेंचा दावा
What Poonam Mahajan Said About Pramod Mahajan ?
Poonam Mahajan : ‘प्रमोद महाजन यांना ठार करण्याचं षडयंत्र कशासाठी आखलं गेलं?’ पूनम महाजन यांचं उत्तर, “त्यांना…”
Ajit Pawar on Amit Shah
‘देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री?’, अमित शाहांच्या त्या विधानावर अजित पवारांचं मोठं विधान; म्हणाले, “निवडणूक झाल्यावर…”
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
Sada Sarvankar
Sada Sarvankar : “मला निवडणूक लढवावीच लागेल”, सदा सरवणकर हतबल; म्हणाले, “राज ठाकरेंनी माझी…”

टाटा उद्योगसमूहाने देशात व्यवसायासह समाजाचे ऋण म्हणून अनेक लोकोपयोगी उपक्रमांसाठी विश्वस्त न्यास आणि सढळ आर्थिक मदतीचा आखून दिलेल्या पाऊलवाटेवर लोढा कुटुंबीयांनी मार्गक्रमण सुरू केल्याचे या निमित्ताने म्हटले जात आहे.मॅक्रोटेक डेव्हलपर्स ही देशातील आघाडीची गृहनिर्माण क्षेत्रातील कंपनी आहे. कंपनीचे बाजारमूल्य १.१७ लाख कोटी रुपये असून, कंपनीत प्रवर्तकांचा हिस्सा ७२.११ टक्के आहे. अभिषेक लोढा आणि त्यांच्या कुटुंबीयांनी समूहातील लोढा फिलान्थ्रॉपी फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेला मॅक्रोटेकमधील १८.०९ टक्के हिस्सा हस्तांतरित केला. भांडवली बाजार शुक्रवारी बाजार बंद होताना मॅक्रोटेकच्या समभागाचे मूल्य १,१७५ रुपये होते.

हेही वाचा >>>स्टेट बँकेला १८,३३१ कोटींचा तिमाही नफा

यामुळे संस्थेला एकूण २१ हजार कोटी रुपयांचा हिस्सा मिळाला आहे. ही संस्था राष्ट्रीय आणि सामाजिक कार्यासाठी या निधीचा वापर करेल. मॅक्रोटेक डेव्हलपर्सचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्याधिकारी अभिषेक लोढा यांनी २८ ऑक्टोबरला याबाबत घोषणा केली होती. ते आणि त्यांचे कुटुंबीय २० हजार कोटी रुपयांचा हिस्सा लोढा फिलान्थ्रॉपी फाऊंडेशनला देतील, असे त्यांनी जाहीर केले होते. या संस्थेच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी सल्लागार मंडळ पुढील वर्षी जानेवारी महिन्यात स्थापन केले जाणार आहे. देशात आद्य उद्योगघराणे असलेल्या टाटा कुटुंबीयांनी त्यांच्याकडील मोठा हिस्सा टाटा विश्वस्त न्यासांना हस्तांतरित केला आहे. या न्यासांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात शिक्षण, आरोग्य, संशोधन क्षेत्रात काम सुरू आहे.