LIC म्युच्युअल फंड हा भारतातील मालमत्ता व्यवस्थापन उद्योगातील सर्वात प्रतिष्ठित फंड घराण्यांपैकी एक आहे. LIC म्युच्युअल फंडाने सोमवारी एक मोठी घोषणा केली आहे. LIC म्युच्युअल फंडाने IDBI म्युच्युअल फंडाचे अधिग्रहण केले आहे. कंपनीचे विलीनीकरण २९ जुलै २०२३ पासून प्रभावी झाले आहे.

एलआयसीने म्युच्युअल फंड का घेतला?

व्यवस्थापनाखालील मालमत्ता वाढवण्यासाठी एलआयसीने हे पाऊल उचलले आहे. चालू आर्थिक वर्षाच्या जून अखेरीस कंपनीची व्यवस्थापन अंतर्गत मालमत्ता (AUM) १८,४०० कोटी रुपये होती. IDBI म्युच्युअल फंडाचा निधी व्यवस्थापक (MF) हा ३६५० कोटी रुपये होता. एलआयसीने हा निर्णय उत्पादन ऑफर वाढवण्यासाठी आणि विविधता आणण्यासाठी घेतला आहे. तसेच देशातील आघाडीचे फंड हाऊस म्हणून उदयास येण्यासाठी व्यवस्थापनाखालील मालमत्ता (AUM) वाढवण्याचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.

Germanys Warren Buffett Karl Hellerding
जर्मनीचा वॉरेन बफे : कार्ल हेलरडिंग
15 November Mesh To Meen Horoscope
१५ नोव्हेंबर पंचांग: कार्तिक पौर्णिमेला कोणाला होईल धनप्राप्ती?…
life insurance fraud pune marathi news
पुणे: आयुर्विमा पॉलिसीच्या नावाखाली तरुणीची १३ लाखांची फसवणूक
Aroh Welankar New Villa
Bigg Boss फेम अभिनेत्याने पुण्यात खरेदी केला आलिशान व्हिला! चाहत्यांना दाखवली पहिली झलक, मराठी कलाकारांनी केलं कौतुक
Excessive expenditure on ST Bank employees But members of bank still did not get dividend
एसटी बँकेच्या कर्मचाऱ्यांवर लाखोंची खैरात, सभासदांना ठेंगा; कर्मचारी संघटना म्हणते…
Abhishek Lodha transferred 18 percent stake in the company to a charitable trust print eco news
आता लोढादेखील टाटांच्या दानकर्माच्या वाटेवर; धर्मादाय न्यासाला कंपनीतील १८ टक्के हिस्सा हस्तांतरित
LIC net profit falls to Rs 7621 crore print eco news
एलआयसीचा निव्वळ नफा घसरून ७,६२१ कोटींवर; बाजार वर्चस्वासह, हिस्सेदारी वाढून  ६१ टक्क्यांपुढे
Tata Motors profit falls 11 percent as vehicle sales decline
वाहनांची विक्री घसरल्याने टाटा मोटर्सच्या नफ्यात ११ टक्के घट;  दुसऱ्या तिमाहीत ३,३४३ कोटी रुपयांवर

हेही वाचाः LPG Price : खुशखबर! एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत मोठी कपात, ‘ही’ आहे नवी किंमत

किती योजनांचे विलीनीकरण होणार?

IDBI म्युच्युअल फंडाचा निधी व्यवस्थापक (MF) विलीनीकरण पूर्ण झाल्यानंतर IDBI MF च्या २० पैकी १० योजना LIC MF मध्ये विलीन केल्या जातील. उर्वरित १० योजना LIC MF द्वारे स्वतंत्रपणे ताब्यात घेतल्या जाणार आहेत. यानंतर LIC ची एकूण योजना संख्या ३८,००० होणार आहे.

हेही वाचाः फ्लिपकार्टमधील ‘बन्सल’ युगाचा अस्त, बिन्नी यांनीच कंपनीला विकले, आता पुढे काय?

गुंतवणूकदारांचे काय होणार?

आयडीबीआय एमएफ विलीनीकरणानंतर गुंतवणूकदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. IDBI MF च्या योजनेत गुंतवणूक केलेल्या सर्व गुंतवणूकदारांना LIC MF च्या विविध उत्पादनांमध्ये इक्विटी, डेट, हायब्रिड, सोल्यूशन ओरिएंटेड थीम, ETF आणि इंडेक्स फंड यांचा समावेश असेल. LIC म्युच्युअल फंडाचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ टी एस रामकृष्णन म्हणाले, “या विलीनीकरणामुळे मिड कॅप, स्मॉल कॅप, गोल्ड फंड, पॅसिव्ह फंड सेगमेंटमध्ये आमची योजना बळकट करण्याचा आमचा उद्देश आहे. विलीनीकरणामुळे आम्हाला बाजारपेठेत व्यापक उपस्थिती मिळेल आणि उत्पादनांच्या वाढीमुळे चांगला नफा मिळू शकेल. यासह मालमत्ता व्यवस्थापन उद्योगातील उदयोन्मुख संधींचा लाभ घेण्यास देखील हे आम्हाला मदतशीर ठरणार आहे. LIC MF ही भारतीय आयुर्विमा महामंडळाची (LIC) मालमत्ता व्यवस्थापन कंपनी आहे. त्याचे प्रायोजक आणि भागधारक हे LIC हाऊसिंग फायनान्स लिमिटेड, GIC हाउसिंग फायनान्स लिमिटेड आणि युनियन बँक ऑफ इंडिया आहे.