वृत्तसंस्था, नवी दिल्ली

ग्राहकोपयोगी वस्तू-सेवा क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या गोदरेज कंझ्युमरने रेमंडच्या ग्राहक सेवा व्यवसायाचे सुमारे २,८२५ कोटी रुपयांना अधिग्रहण केले आहे. रेमंडची ग्राहक सेवा कंपनी वैयक्तिक आरोग्यनिगेशी निगडित वस्तूंची निर्मिती करणारी आघाडीची कंपनी आहे. गोदरेज कंझ्युमर ग्राहक सेवा व्यवसायासोबत, पार्क अव्हेन्यू, केएस, कामसूत्र अशा प्रसिद्ध नाममुद्रादेखील ताब्यात घेणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – ‘ओयो’साठी मार्च तिमाही लाभकारक; प्रथमच सकारात्मक रोख प्रवाहाची नोंद, आयपीओसाठी ‘सेबी’कडे नव्याने प्रस्ताव सादर

ग्राहक सेवा व्यवसायाच्या अधिग्रहणामुळे कंपनीच्या उत्पादन ताफ्यांमध्ये नव्या प्रकारच्या उत्पादनांची भर पडणार आहे. रेमंड ही पार्क अव्हेन्यू, केएस यांसारख्या दुर्गंधीनाशक अर्थात डिओ स्प्रे नाममुद्रांची निर्माता, तर तिचे कामसूत्र या नाममुद्रेअंतर्गत कंडोम बाजारात आहेत, असे गोदरेज कंझ्युमरचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर सीतापती म्हणाले. इतर उदयोन्मुख बाजारपेठांच्या तुलनेत भारतातील या उत्पादनांचा कमी दरडोई वापर लक्षात घेता या श्रेणींमध्ये दुहेरी अंकी विकास साधण्याची क्षमता आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Acquisition of raymond customer care business from godrej consumer for rs 2825 crore ssb