Ranveer Singh Sold Flats : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगने मुंबईत दोन अपार्टमेंट विकली आहेत. मनी कंट्रोलमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, मुंबईतील गोरेगाव परिसरातील हे दोन फ्लॅट एकूण १५.२५ कोटी रुपयांना विकले गेले आहेत. ऑनलाइन प्रॉपर्टी कन्सल्टन्सी IndexTap.com नुसार, रणवीर सिंगने हे दोन फ्लॅट डिसेंबर २०१४ मध्ये ४.६४ कोटी रुपये प्रति फ्लॅट या दराने खरेदी केले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एवढा पैसा फ्लॅटच्या मुद्रांक शुल्कावर खर्च

दोन्ही फ्लॅट Oberoi Exquisite चा भाग आहेत, ओबेरॉय रियल्टीचा हा प्रकल्प मुंबईतील गोरेगाव येथे आहे. फ्लॅटच्या स्टॅम्प ड्युटीबद्दल बोलायचे झाल्यास प्रति फ्लॅट ४५.७५ लाख रुपये आहे. कागदपत्रांनुसार, जर आपण त्याच्या क्षेत्राबद्दल बोललो तर ते एकूण १,३२४ स्क्वेअर फूटमध्ये पसरलेले आहे. याबरोबरच प्रत्येक फ्लॅटमध्ये एकूण ६ पार्किंगच्या जागा आहेत. हा फ्लॅट त्याच गृहसंकुलातील एका व्यक्तीने खरेदी केला आहे.

हेही वाचाः आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये ०९ नोव्हेंबरपर्यंत १२.३७ लाख कोटी रुपये एकूण प्रत्यक्ष कर संकलन

रणवीर सिंगने ११९ कोटी रुपयांचा फ्लॅट खरेदी केला होता

रणवीर सिंगच्या मालमत्तेबद्दल बोलायचे झाले तर २०२२ मध्ये त्याने मुंबईतील वांद्रे भागात quadruplex फ्लॅट घेतला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या फ्लॅटची किंमत सुमारे ११९ कोटी रुपये होती. हे फ्लॅट रणवीर सिंगचे वडील जगजीत सुंदर सिंग भवनानी आणि अभिनेत्याची कंपनी Oh Five Oh Media Works LLP यांनी खरेदी केले आहेत. दोघेही कंपनीत संचालकपदावर आहेत. या मालमत्तेचा सौदा ११८.९४ कोटी रुपयांना झाला आणि त्यासाठी ७.१३ कोटी रुपये मुद्रांक शुल्क भरण्यात आले.

हेही वाचाः दिवाळीपूर्वी सोने-चांदीच्या दरात घसरण, दुकानदारांना मोठ्या विक्रीची अपेक्षा

या अभिनेत्यांनीही त्यांचे फ्लॅटही विकले

रणवीर सिंग व्यतिरिक्त अलीकडे अक्षय कुमार आणि सोनम कपूर यांनीही मोठ्या प्रॉपर्टी डील्स केल्या आहेत. सोनम कपूरला वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समधील ५ हजार स्क्वेअर फुटांपेक्षा जास्त अपार्टमेंट ३२ कोटी रुपयांना विकायचे आहे. तर अक्षय कुमारने १२०० स्क्वेअर फुटांपेक्षा जास्तीचा फ्लॅट ६ कोटींना विकला होता. हा करार २०२२ मध्ये झाला होता.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor ranveer singh sells two apartments in mumbai the deal was done in crores vrd