पीटीआय, नवी दिल्ली
अब्जाधीश गौतम अदानींच्या नेतृत्वाखालील अदानी समूहाने बीक्यू क्विंटिलियन बिझनेस मीडिया प्रायव्हेट लिमिटेडमधील उर्वरित ५१ टक्के हिस्सेदारी विकत घेतली आहे. राघव बहल यांच्या मालकीच्या असणाऱ्या डिजिटल व्यापारवृत्त मंच असलेल्या बीक्यू क्विंटिलियन बिझनेसची १०० टक्के मालकी मिळविली.
अदानी एंटरप्रायझेसची उपकंपनी असलेल्या एएमजी मीडिया नेटवर्क्सच्या संचालक मंडळाने विद्यमान वर्षात क्विंटिलियन बिझनेस मीडिया प्रायव्हेट लिमिटेडमधील उर्वरित ५१ टक्के समभाग घेण्यासाठी सामंजस्य करार केला होता. याआधीची ४९ टक्के हिस्सेदारी ४७.८४ कोटी रुपयांना खरेदी करण्यात आली होती. मात्र आता नव्याने खरेदी करण्यात आलेल्या ५१ टक्के हिस्सेदारी कराराची रक्कम जाहीर करण्यात आलेली नाही. संपादन पूर्ण झाल्यानंतर क्विंटिलियन बिझनेस मीडिया ही अदानी समूहातील एएमजी मीडिया नेटवर्क्स उपकंपनी बनणार आहे.
एनडीटीव्हीमधील ६५ टक्के हिस्सेदारी खरेदी करण्यापूर्वी अदानी समूहाने क्विंटिलियन बिझनेस मीडिया प्रायव्हेट लिमिटेडमधील ४९ टक्के हिस्सेदारी खरेदी केली होती. बीक्यू प्राइम हे पूर्वी ब्लूमबर्ग क्विंट म्हणून ओळखले जात होते, जो अमेरिकेतील वित्तीय वृत्तसंस्था ब्लूमबर्ग मीडिया आणि राघव बहलच्या क्विंटिलियन मीडियाचा पूर्वीचा संयुक्त उपक्रम होता. ब्लूमबर्ग गेल्या वर्षी मार्चमध्ये या करारातून बाहेर पडला होता.
अदानी समूहाने विविध प्रकारचे प्रकाशन, जाहिरात, प्रसारण, वितरण या व्यवसायात प्रवेश करण्यासाठी एएमजी मीडिया नेटवर्क्सची स्थापना केली आहे. सप्टेंबर २०२१ मध्ये, एएमजी मीडिया नेटवर्क्सने ज्येष्ठ पत्रकार संजय पुगलिया यांची प्रमुखपदी नियुक्ती केली होती.